इंजेक्शनची सुई कोणतत्या धातूपासून तयार करतात माहितीये?

Interesting Facts : रोजच्या आयुष्यात अनेकदा काही असे प्रसंग येतात जेव्हा आपली प्रकृती बिघडते. अशा वेळी सर्वजण थेट डॉक्टरकडे धाव घेतात.   

सायली पाटील | Updated: Nov 7, 2023, 01:23 PM IST
इंजेक्शनची सुई कोणतत्या धातूपासून तयार करतात माहितीये?  title=
Injection Needle is made of which metal know interesting fact

Interesting Facts : जन्मलेल्या बाळाला ठराविक अंतरानंतर दिली जाणारी लस असो किंवा मग अगदी हल्ली हल्लीचच उदाहरण घ्यायचं झालं तर, कोरोनाची प्रतिबंधात्मक लस असो. इंजेक्शन आपण सर्वांनीच पाहिलं आणि घेतलं आहे. किंबहुना आपल्यापैकी अनेकांना इंजेक्शनची भीतीही वाटत असेल.

ताप आला किंवा मग उसण भरली तर, डॉक्टरकडे गेलं असता ज्यावेळी, 'तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल...' असा सल्ला दिला जातो तेव्हा भीतीनं अनेकांचाच चेहरा पाहण्याजोगा झालेला असतो. ही भीती अगदी लहानपणापासून मोठं होईपर्यंतही कायम असते. हा ज्याचात्याचा वैयक्तिक मुद्दा. पण, याच भीतीदायक इंजेक्शनविषयी तुम्हाला कधी काही प्रश्न पडले आहेत का? 

इंजेक्शनची सुई कशापासून तयार होते? 

तुम्हाला माहितीये, ज्या इवल्याश्या पण टोचल्यावर डोळ्यातून पाणी येणाऱ्या सुईला तुम्ही घाबरता ती इंजेक्शनची सुई स्टेनलेस स्टील (stainless-steel) पासून तयार केलेली असते. यालाच कार्बन स्टील असंही म्हणतात. हाइपोडर्मिक सुया सहसा स्टील किंवा नाइओबियम ट्यूबपासून तयार केल्या जातात. 

हेसुद्धा वाचा : भारतातील शेवटच्या मुघल बादशाहचं कुटुंब आज कुठंय? वास्तव तुम्हाला हादरवून सोडेल 

सुई तयार करण्यासाठी ट्यूबला लहान डायमधून खेचलं जातं. त्याचं टोक तीक्ष्ण करण्यासाठी काहीसं वाकवलं जातं. इंजेक्शनची सुई मजबूत धातूपासूनच तयार केली जाणं अपेक्षित असतं, जेणेकरून ती कधीच तुटून शरीरात अडकणार नाही. असं झाल्यास इंफेक्षनचा धोका वाढतो. इंजेक्शनमधील पोकळ सुईच्या माध्यमातून शरीरात औषध पोहोचवलं जातं. या प्रक्रियेला वैद्यकिय भाषेत विविध नावं देण्यात आली आहेत. 

इंजेक्शनचेही प्रकार... 

इंट्रावेनस इंजेक्शनचा वापर औषध थेट शरीरातील नसांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. टिटनेस किंवा मग कोविडची लस वरील प्रकारात मोडते, म्हणूनच हे इंजेक्शन हातावर घेतले जातात. इंट्रामस्‍क्‍युलर इंजेक्‍शन मात्र मांसपेशींमध्ये देण्यात येतात. जेणेकरून ते थेट रक्तात मिसळून शरीरावर तातडीनं परिणाम करतील. म्हणूनच हे इंजेक्षन जांघेवर देण्यात येतात. 

इंजेक्शनचे जितके प्रकार तितकाच त्यांचा प्रभावही वेगवेगळा. अशा या इंजेक्शनच्या सुईबाबतही कमाल माहिती आहे ना ही? इथून पुढं कधी डॉक्टरांकडे गेलात आणि इंजेक्शन घेत असाल तर त्या सुईबाबतची ही माहिती विसरु नका.