'मुलगा गोरा आणि मुलगी सावळी...'; प्रश्न विचारणाऱ्यांना ट्विंकलचे सडेतोड उत्तर म्हणाली...

Twinkle Khanna on Son and Daughter's Skin Tone : ट्विंकल खन्नानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलीच्या आणि मुलाच्या रंगावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 26, 2024, 04:38 PM IST
'मुलगा गोरा आणि मुलगी सावळी...'; प्रश्न विचारणाऱ्यांना ट्विंकलचे सडेतोड उत्तर म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Twinkle Khanna on Son and Daughter's Skin Tone : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्यांना दोन मुलं असून आरव आणि नितारा अशी त्यांची नावं आहे. आरव हा सध्या परदेशात त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. तर नितारा शाळेत जात असून अजूनही ती सोशल मीडियापासून दूर राहते. ट्विंकल ही नेहमीच तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. यावेळी ट्विंकल खन्नानं तिच्या मुलांच्या रंगावरून होणाऱ्या तुलनेवर स्पष्ट वक्तव केलं आहे. 

ट्विंकल खन्नानं FICCI FLO सोबत बोलताना सांगितलं की कशा प्रकारे त्याचा मुलगा आरव आणि लेक निताराची त्वचेच्या रंगावरून तुलना करण्यात आली होती आणि तिनं कशा प्रकारे तिच्या मुलीला सांभाळलं की तिला स्वत: बद्दल कमीपणा नाही तर ती सगळ्यात चांगली आहे हे वाटू लागलं. याविषयी सांगताना ट्विंकल म्हणाली, मी माझ्या पहिल्या बाळानंतर खूप काही शिकले. त्यानंतर मला वाटू लागलं की तुमचं पहिलं बाळ हे मॅन्युअल असतं. तुम्ही त्या बाळावर थोडे प्रयोग करुन पाहता. आपल्या दुसऱ्या बाळासोबत, ज्या गोष्टी जाणवल्या त्या या होत्या की ही एखाद्या सर्वसामान्य भारतीय मुलीसारखी दिसते. नेहमीच तिच्या भावाच्या रंगावरून तुलना होईल. आपल्या देशात अशा गोष्टी होतात. मी निर्णय घेतला की मी या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष देईल की तिला स्वत: विषयी खूप चांगलं वाटायला हवं. मी तिला नेहमी सांगितलं की ती खूप सुंदर आहे. जशी की फ्रिदा कालो आणि त्या किती सुंदर आहेत.  जर ती ब्राउन आहेत तर मी तिला सांगेन की तुला रंग हा गोल्डन आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : दीड महिन्याच्या पाळीव श्वानावर वारंवार लैंगिक अत्याचार; त्याचा जीव वाचवत अभिनेत्री म्हणाली...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ट्विंकलनं पुढे सांगितवं की कशा प्रकारे तिनं एक गोष्ट सांगितली आणि तिच्यावर किती गर्व आहे हे सांगितलं. त्यांनी सांगितलं की एक दिवस ती तिच्या भावासोबत समुद्र किणाऱ्यावर बसली होती आणि आराव तिला सुर्यप्रकाशापासून वाचवत होता. त्यावर तिनं सांगितलं की मला सनब्लॉकची गरज नाही. माझी त्वचा तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. पांढरं टी-शर्ट मळकट होतं, पण ब्राउन रंगाचं टीशर्ट नाही होतं. तुम्ही त्याला पाहू शकत नाही, त्यामुळे मी मोठी आहे. ट्विंकल खन्नानं जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला असं वाटलं की ती जिंकली आहे.