#InternationalDanceDay : 'हे' डान्स कराल तर रोज किमान 200 कॅलरीज होतील बर्न

वजन घटवण्यासाठी असो किंवा तुमचा फीटनेस राखण्यासाठी किमान घरच्याघरी व्यायाम करणे गरजेचे आहे. पण नेहमी एकाच प्रकारचा व्यायाम करणेही कंटाळवाणे होऊ शकते. म्हणूनच तुमच्या सकाळच्या व्यायामाच्या वेळी हे काही इंटरेस्टिंग़ डान्सिंग मूव्हस किंवा प्रकार तुम्हांला फीट ठेवायला मदत करते. 

Dipali Nevarekar & Updated: Apr 29, 2018, 12:20 PM IST
#InternationalDanceDay  :  'हे' डान्स कराल तर रोज किमान 200 कॅलरीज होतील बर्न

 मुंबई : वजन घटवण्यासाठी असो किंवा तुमचा फीटनेस राखण्यासाठी किमान घरच्याघरी व्यायाम करणे गरजेचे आहे. पण नेहमी एकाच प्रकारचा व्यायाम करणेही कंटाळवाणे होऊ शकते. म्हणूनच तुमच्या सकाळच्या व्यायामाच्या वेळी हे काही इंटरेस्टिंग़ डान्सिंग मूव्हस किंवा प्रकार तुम्हांला फीट ठेवायला मदत करते. 
 
 आज जागतिक नृत्य दिवस साजरा केला जातो. जगभरात नृत्याचे विविध प्रकार आहेत. नृत्य  हा केवळ कलाक्षेत्राशी निगडीत नसून फीटनेस सुधारण्यासाठीही 'नृत्य' मदत करते. मग तुम्ही 'वेटलॉस'च्या मिशन आहात? सोबतच तुम्हांला नृत्याची आवड असेल तर या काही नृत्यप्रकारांनी तुम्ही नक्कीच दिवसाला किमान 200 कॅलरीज बर्न करू शकता.  

 कोणते आहेत हे नृत्यप्रकार ?  

 भांगडा - 
 
 भांगडा हा मूळचा उत्तर भारतातील पंजाब प्रांताचा नृत्य प्रकार आहे. पण 
 'मसाला भांगडा' हा एक इंटरेस्टिंग व्यायाम प्रकारही आहे. सुमारे 45 मिनिटांच्या एका सेशनमधून 500 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. 
 
 बेली डान्स - 
 
 सालसा, हुला हूप्स किंवा बेली डान्सिंगमुळे सुमारे तासाभरात 250 कॅलरीज कमी होतात. बेली डान्स हा अरेबिक डान्स प्रकार आहे. अरब देशात हा प्रामुख्याने केला जात असला तरीही त्याचे खास प्रशिक्षण आता सहज  उपलब्ध झाले आहे.  
 
 झुंबा -

 तासभर झुंबा केल्याने शरीराचा व्यायाम होतो. यामुळे सुमारे 334 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. झुंबा हा देखील आजकाल खूप लोकप्रिय नृत्यप्रकार आणि सोबतच फीटनेस फंडा आहे. 
 
 बाटुका - 
 
 बाटुका हा एक हाय इंटेन्सिटी डान्स फॉर्म आहे. अ‍ॅरोबिक अ‍ॅक्टिव्हिटीसोबत मार्शिअल आर्ट केल्याने सुमारे 430 कॅलरीज बर्न होतात.

 बोकवा - 
 
 काही नृत्यप्रकार आणि कार्डियो यांचे एकत्र मिश्रण असलेला बोकवा हा प्रकार शरीराची खालची बाजू सुडौल बनवायला मदत करतो. यामधून तासाला सुमारे 1000 कॅलरीज बर्न होतात.