International Men's Day 2022: महिलांना पुरूषांच्या 'या' गोष्टी खुप आवडतात? जाणून घ्या

International Men's Day 2022: पुरूषांच्या 'या' गोष्टी तरूणींना खुप आकर्षित करतात, तुम्हाला माहितीयत का? 

Updated: Nov 19, 2022, 08:31 PM IST
 International Men's Day 2022: महिलांना पुरूषांच्या 'या' गोष्टी खुप आवडतात? जाणून घ्या  title=

International Men's Day 2022: जगभरात आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 (International Men's Day) साजरा करण्यात येत आहे.समाजाच्या विकासासाठी स्त्री आणि पुरुष दोघांचेही महत्त्व आणि योगदान आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जगभरात काम केले जात असले, तरी पुरुषांच्या आरोग्याबाबत जागरुकता असणेही महत्त्वाचे आहे. पुरुषांचा मानसिक विकास, त्यांच्या सकारात्मक गुणांची प्रशंसा आणि लैंगिक समानता या उद्देशाने दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men's Day 2022) साजरा केला जातो. यानिमित्त जाणून घेऊयात, पुरूषांच्या कोणत्या गोष्टी तरूणींना खुप जास्त आकर्षित करतात. 

हे ही वाचा : तरूणांनो 'या' तरूणींशी लग्न करा, खुप भाग्यवान असतात

कॉन्फिडेन्स

स्वत:मध्ये भरपूर आत्मविश्वास असलेले पुरुष महिलांना खुप आवडतात. आत्मविश्वासी पुरुष (Confident men) त्यांच्या मालकीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल असुरक्षित राहत नाहीत. ते कोणाच्याही समोर आपले म्हणणे मांडण्यास कचरत नाहीत आणि कोणावरही अवलंबून राहत नाहीत. पुरुषांचा हा गुण महिलांना सर्वाधिक आकर्षित करतो. त्यातच जर ओव्हर कॉन्फिडेन्स असलेले पुरूष महिलांना खुप इरीटेट वाटतात.

 मॅच्यूर 

विचार आणि बोलण्यात मॅच्यूर असणारे पुरूष (Mature men) महिलांना खूप आकर्षित करतात. वाढत्या वयाबरोबर मॅच्यूरीटी येतेच असे नाही. कधी कधी आयुष्यातून मिळणारे अनुभवही माणसाला मॅच्यूर बनवतात. त्याची झलक त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसते. मॅच्यूर पुरुष सर्वप्रथम ऐकतात, समजून घेतात आणि मग आपले मत मांडतात. तुमच्या हा मध्ये हा मिळवण्यापेक्षा ते तुम्हाला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींची माहिती देतात. 

सेंस ऑफ ह्यूमर 

चांगला सेंस ऑफ ह्यूमर (Sense of Humour) असणारे पुरूष महिलांना खुप आवडतात. कारण अशा पुरुषांसोबत वेळ घालवायला महिलांना खुप आवडतो.अशा पुरुषांसोबत त्यांना कंटाळा येत नाही, त्या नेहमी आनंदी राहतात. 

फिटनेस फ्रिक 

चांगल्या दिसण्यासह आपल्या फिटनेसवर (Fitness) जास्त लक्ष देणारे पुरुष महिलांना खुप आवडतात. परंतु जर तुम्ही अजूनही खा, प्या आणि आनंदी राहा या पद्धतीचे अनुसरण करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की महिलांना असे पुरुष अजिबात आवडत नाहीत. तुमच्याकडे सिक्स पॅक अॅब्स नसले, बायसेप्स नसतील तरी तुम्ही तुमच्या फिटनेसबाबत जागरूक असाल, तर जोडीदार म्हणून तुम्ही महिलांसाठी परफेक्ट आहात.

स्टायलिश 

प्रत्येक महिलेला स्टायलिश (Stylish) पुरूष आवडतातच. तुमची ड्रेसिंग स्टाइल तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जाते. त्यामुळे कपडे निवडताना खूप काळजी घ्या. याचा अर्थ असा नाही की केवळ औपचारिक कपडे घाला, रंगाचा प्रयोग करू नका. भडक कपडे, फाटलेल्या जीन्स, स्लोगन टी-शर्ट कधी कधी स्त्रियांना प्रभावित करण्याऐवजी तुमचा मुद्दा बिघडवू शकतात.

रोमँटीक 

प्रत्येक स्त्रीला तिचा जोडीदार थोडा रोमँटिक (Romantic) असावा असे वाटते. प्रत्येक छोट्या प्रसंगी त्याने फुले, केक, भेटवस्तू द्यावी. कँडल लाईट डिनरवर घेऊन जावे, अशी त्यांची इच्छा असते. परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यात कोणतीही कसर सोडू नका. त्यांना तुमचा पूर्ण वेळ द्या आणि थोडी प्रशंसा देखील करा. 

दरम्यान या काही पुरूषांच्या (International Men's Day 2022) 6 सवयी असतात, ज्य़ा महिलांना खुप आकर्षित करतात. त्यामुळे पुरूषांनो तुमच्यात या सवयी नसतील आताच सवयी करायला सुरुवात करा.