मुंबई : अनेकजण आहारामध्ये कच्च्या अंड्यांचा समावेश करतात.
मसल्स बनवण्यासाठी अनेक अॅथलिट्स किंवा अगदी मेयॉनीज करतानाही कच्च्या अंड्यांचा वापर करतात. पण अशाप्रकारे अंडी खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते का ? अशी शंका तुमच्या मनात आली असल्यास हा सल्ला नक्की वाचा.
पोषणद्रव्य -
एका अंड्यामधून सुमारे 3 ग्रॅम प्रोटीन मिळते. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि ई मिळते. अंड शिजवल्यास त्यातील पोषणद्रव्य कमी होऊ शकतात.
कच्च्या अंड्यातील choline हे मिनरल घटक मेंदूचे कार्य सुधारायला मदत करतात. त्यामधील प्रोटीन घटक नर्व्हस आणि इम्यू सिस्टीम सुधारायला मदत करतात. मात्र वाफावल्यानंतर हे कमी होत नाही. त्यामुळे पोषणद्रव्यांचा विचार करत असाल तर शिजवलेले आणि कच्च अंड हे दोन्ही एकाच सर्वसाधारणपणे सारख्याच प्रमाणात पोषणद्रव्य देतात.
पचन होण्यास किती फायदेशीर ?
जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या अहवालानुसार, कच्च अंड खाल्यानंतर त्यापैकी केवळ 50% प्रोटीन शरीरात शोषले जाते. मात्र अंड शिजवलेले असल्यास सुमारे 90% प्रोटीन शरीरात शोषले जाते.
हेल्थ रिस्क
कच्च अंड खाण्यामध्ये एक लहान हेल्थ रिस्क आहे. अंड नीट स्वच्छ न धुतल्यास आरोग्याला अपायकारक ठरू शकते. अंड्यातील कवचावर salmonella इंफेक्शन असल्यास फूड पॉयजनिंग, डायरिया, उलट्या, ताप, डोकेदुखी हा त्रास होऊ शकतो.