Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेते धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये आपली भूमिका मांडताना पत्रकारांसमोर सोनावणेंनी अनेक महत्त्वाची विधानं केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी निघ्रृण हत्या करण्यात आली. यासंदर्भात बोलताना सोनावणे यांनी, "ही सुरवात मे महिन्यात झाली. खंडणीच्या प्रकरणातून याची सुरवात झाली," असं म्हटलं. पुढे त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, "त्या दिवशी पोलिसांना नेमका फोन कोणी केला याची चौकशी करा," अशी मागणीही त्यांनी केली. नाव न घेता बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडे यांना उत्तर देताना, "जो कोणी खून व्यवहारातून केला म्हणत आहे ते खरं आहे पण खंडणीच्या व्यवहारातून," असंही म्हटलं. तसेच, "टॉर्चर करून संतोषला मारलं. त्यानं कुठला गुन्हा केला?" असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला.
सोनावणे यांनी, 6 तारखेचा फोन कॉलचा सिडीआर काढा, अशी मागणीही केली. "बनसोड पाटील महाजन हे पोलीस अधिकारी कोणाच्या संपर्कात त्यांचे सिडीआर काढा," असं सोनावणे म्हणाले. "इलेक्शनच्या काळात आमचे सिडीआर काढले जायचे. आमचे सिडीआर काढले आता आरोपीचे सोडीआर काढा," असंही सोनावणे म्हणाले. "चौथा आरोपी अटक की सरेंडर झालं हे स्पष्ट व्हावं. मारेकाऱ्याला फाशी झाली पाहिजे. पाचव्या आरोपीला केव्हा अटक होणार? तीन आरोपी अजून ही फरार आहेत त्यांना केव्हा अटक होणार?" असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला आहे. "15 दिवसानंतर ही तीन आरोपी अटक होत नाहीत ही चुकी कोणाची?" असा सवालही स्थानिक खासदाराने उपस्थित केला आहे.
"तिन्ही केस सीआयडीकडे गेल्या आहेत. तिन्ही केस क्लब केल्या आहेत. जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये आहेत. आरोपींच्या नावे किती प्रॉपर्टी आहेत याची चौकशी झाली पाहिजे. गोवर्धन सानप कुठल्या जातीचे? त्यांच्या मृत्यूचा तपास केला पाहिजे. त्यांचा मृत्यू ही संशयास्पदरित्या झाला आहे," असंही सोनावणे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे.