वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का ?

स्विमींग पूल मध्ये  अथवा पावसात भिजताना तुम्हाला तुमचा मेक-अप तसाच रहावा असे वाटत असते.

health.india.com | Updated: Aug 18, 2017, 08:59 PM IST
वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का ? title=

मुंबई  : स्विमींग पूल मध्ये  अथवा पावसात भिजताना तुम्हाला तुमचा मेक-अप तसाच रहावा असे वाटत असते.

मग यासाठी तुम्ही अशा ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करता. Cosmetologist डॉ.नंदीता दास यांच्याकडून जाणून घेऊयात असेे वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का?
 
 वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का?

 मेक-अप केल्यावर त्वचेतील घाम अथवा तेलामुळे तो खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेक-अपमध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात.वॉटरप्रुफ मेक-अप मधील काही घटक जे तुमच्या त्वचेमधील पिगमेंटेशन झाकण्यासाठी वापरण्यात येतात ते घटक जर नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांप्रमाणे केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते.पण काही वेळा अशा वॉटरप्रूफ मेक-अपची सौदर्यप्रसाधने वापरणे सुरक्षित असू शकत नाही.

 वॉटरप्रूफ मेक-अप कसा काढाल?

चेह-यावरील जाड वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर विकत घ्यावे लागते.वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणे उत्तम ठरेल.यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावा.थोड्यावेळ ते तेल तसेच राहू द्या व काही मिनीटांनी तो भाग स्वच्छ धुवा.चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे कोल्ड क्रीम वापरणे फायद्याचे ठरते.