मुंबई : जांभळांच्या बियांचे (Jambhul Seeds) अनेक औषधी फायदे आहेत. हे फायदे अनेकांना माहिती नाहीत. जांभळांच्या बियांचे अनेक गुणकारी आणि औषधी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, मधुमेहावर जांभळांच्या बिया या फार गुणकारी ठरतात. तसेच या बियांमुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास फायदेशीर ठरते. या बिया नक्की कोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (jambhul seeds very useful to diabetes know other benefits)
मधुमेह नियंत्रण
मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी जांभळांच्या बियांची पावडर गुणकारी ठरते. दररोज जांभळांच्या बियांच्या पावडरचं सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पोटाच्या समस्यांवर लाभदायक
आयुर्वेदात पोट हे शरीराच्या अर्ध्या रोगांचे मूळ मानले जाते, म्हणून पोट निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. जांभळाच्या बियांमुळे पचनसंस्था सुधारते. यामुळे अपचन, गॅससारख्या समस्यांपासून सुटका मिळते. दररोज जांभळांच्या बियांच्या पावडरीचं सेवन पाण्यासोबत केल्यानं फायदेशीर ठरतं.
मानसिक स्वास्थ सुधारणा
दगदगीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक जण मानसिक तणावाखाली असतो. मानसिक ताणामुळे कामात लक्ष लागत नाही. मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी जांभळाच्या बियांचा काढा घेतल्यास आराम मिळतो. यामुळे थकवा दूर होतो. तसेच मानसिक आरोग्य सुधारते.
पाळी संदर्भातील समस्यांपासून सुटका
महिलांना पाळीदरम्यान विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या दरम्यान होणाऱ्या वेदना या असह्य असतात. पण जांभळांच्या बियांच्या पावडरचं सेवन केल्यास त्याचा लाभ होतो. तसेच ही पावडर किडनी स्टोनसाठीही गुणकारी ठरते.
तोंडाला बॅक्टेरिया मुक्त ठेवण्यासाठी, स्वस्थ हिरड्यांसाठी जांभळांच्या बियांच्या पावडरने दंतमंजन केल्यास त्याचा फायदा होतो.
पावडर कशी बनवायची?
जांभळाच्या बिया धुवून उन्हात वाळवून घ्या. वाळल्यानंतर बियांचे बारीक तुकडे करा. यानंकर हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर सकाळी उपाशीपोटी पाण्यात टाकून घेतल्यास फायदेशीर ठरते.
संबंधित बातम्या :
7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर... आता मिळणार वाढीव मेडिकल क्लेम, कसा वाचा
सूचना : कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांना सल्ला घ्यावा.