चेहरा आणि केसांना चमकवेल हा एकच ज्यूस..कॅन्सरचा धोकाही होईल कमी

संधिवात कमी होण्यासदेखिल आहे फायदेशीर 

Updated: Jul 30, 2022, 08:57 PM IST
चेहरा आणि केसांना चमकवेल हा एकच ज्यूस..कॅन्सरचा धोकाही होईल कमी  title=

HEALTH TIPS:   हिरव्या पालेभाज्या आणि त्यातून मिळणारी पोषक तत्व आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहेत आपण जाणतोच ..मात्र तरीही काही जण हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडतो.. पण पालक हे खाण्यासाठी आणि पचनासाठी हलकं असत त्याच्याशिवाय पालकात विटामिन, खनिज तत्व आणि अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं. जे केवळ शरीरालाच न्हवे तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे 

स्किनसाठी आहे खूप फायदेशीर 

रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येऊ लागत 
चेहऱ्यावर डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्यासुद्धा कमी होण्यास मदत मिळते 
पालक ज्यूस चेहऱ्याला सॉफ्ट आणि  हायड्रेट ठेवण्यास मदत करतो 
पालक चा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही 

केसांसाठी आहे बहूउपयोगी 

पालक ज्यूस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात 
डोक्यात सतत खाज उठत असेल तर ती समस्या निघून जाईल 
पालकात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ चांगली होते 
केसांची चमक वाढवायची असेल तर पालक ज्यूस हा अत्यंत फायदेशीर आहे रोज प्यायलाच पहिजे 

आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा 

पालक ज्यूस प्यायल्याने ऍनिमियाचा धोका कमी होतो 
संधिवात कमी होण्यास फायदेशीर 
हिरड्यांसंबंधित काहीही तक्रार असेल तर पालक ज्यूस प्यायलाच हवा 
रोज पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो 

त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि  सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा .