पालकांनो लहानमुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा नाही तर...

डोळ्यांवर सतत निळ्या रंगाचा प्रकाश पडल्यामुळे आकाली म्हातारपण येण्याची शक्यता असते.

Updated: Nov 13, 2019, 11:18 PM IST
पालकांनो लहानमुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा नाही तर...

मुंबई : सध्या कोणतंही काम करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर सर्रास होतो. शिवाय तरूण वर्गामध्ये स्मार्टफोन वापराचे प्रमाण मोठे आहे. आजची पिढी त्यांचा अर्धा दिवस सोशल मीडियावर व्यतीत करते. सतत फोन डोळ्यांसमोर राहिल्याने डोळ्यांवर त्याचे वाईट परिणाम उद्भवतात. 

डोळ्यांवर सतत निळ्या रंगाचा प्रकाश पडल्यामुळे आकाली म्हातारपण येण्याची शक्यता असते. 'ऍजिंग अॅण्ड मॅकेनिझम ऑफ डिझीझ जर्नल' मध्ये प्रकाशीत झालेल्या एका रिपोर्टनुसार 'एलईडी'मधून निघणारा निळा प्रकाश मेंदूतील पेशी आणि डोळ्यांतील बुब्बुळांसाठी हानीकारक असतो. 

संशोधकांनी काही मधमाश्यांना १२ तास निळ्या प्रकाशाच्या सानिध्यात ठेवले. कालांतराने त्या मधमाशांचे वय वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे या मधमाश्यांमध्ये हलचाल करण्याची क्षमता देखील कमी झाली. 

त्यामुळं आपली मुलं किती वेळ फोन वापरतात याकडे पालकांची नजर असणं फार गरजेचं आहे. आताच्या जगात फोन हे महत्त्वाचं साधन असलं तरी, त्याचा वापर किती प्रमाणात करावा याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.