आंबा फ्रिजमध्ये ठेवावा की बाहेर ठेवावा; आरोग्यासाठी काय फायद्याचं?

आंबा खाण्यास प्रत्येकाला आवडतो.

Updated: Jun 26, 2021, 11:05 AM IST
आंबा फ्रिजमध्ये ठेवावा की बाहेर ठेवावा; आरोग्यासाठी काय फायद्याचं? title=

मुंबई : आंबा खाण्यास प्रत्येकाला आवडतो. असे फार क्वचितच लोकं असतील ज्यांना आंबा आवडत नसावा. काही जणं आंबा फ्रीजमध्ये ठेवतात तर काहीजण बाहेर ठेवून तो खातात. मात्र तुम्हाला माहिती पाहिजे की आंबा फ्रीजमध्ये की बाहेर ठेवणं आरोग्यासाठी योग्य आहे. 

एसबीएसमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आंबा फ्रीजमध्ये न ठेवणं चांगलं, असं सांगण्यात आलं आहे. 

या कारणाने आंबा फ्रीजमध्ये ठेऊ नये

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार, आंबे आणि इतर फळांना खोलीतील तापमानावर ठेवणं चांगलं. सामान्य तापमानात फळ ठेवल्याने त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडेंट सक्रिय राहतात. यामुळे आपल्या आरोग्यास बरेच फायदे होतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आंब्याव्यतिरिक्त इतर ट्रॉपिकल फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण ते थंड वातावरणासाठी संवेदनशील असतात.

आंबे घरात ठेवताना या गोष्टींची जरूर काळजी घ्या

  • कच्चा आंबा म्हणजेच कैरी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. असं केल्यास तो योग्य पद्धतीने पिकत नाही आणि त्याचा स्वादही चांगला नाही राहात.
  • जर आंबा लवकर पिकवायचा असेल तर त्याला खोलीतील तापमानावर कागदाच्या पिशवीत बांधून ठेवा.
  • जर आंबा खोलीच्या तापमानात पिकण्यासाठी ठेवला तर तो अधिक गोड आणि रसाळ राहतो.

इतर फळं किंवा भाज्यांसोबत आंब्याला ठेऊ नये

अनेकदा जागा नसताना आपण इतर फळांसोबत किंवा भाज्यांसोबत आंबा ठेवतो. मात्र असं करणं योग्य नाही. जर तुम्ही आंबा अशा प्रकारे ठेवला तर त्याच्या चवीमध्येही फरक पडू शकतो.