किडनी स्टोनपासून व्हायचंय मुक्त... मग या घरगुती उपायांचा करा अवलंब

किडनी स्टोनमुळे पोटात अनेक वेळा असह्य वेदना होतात. अशावेळी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचारही घ्यावे लागतात. काही रुग्णांना तर किडनी स्टोरसाठी ऑपरेशनही करावं लागतं. पण काही घरगुती उपाय (home remedies) केल्यास आपल्याला किडनी स्टोनपासून आराम मिळू शकतो.

Updated: Jul 8, 2022, 04:20 PM IST
किडनी स्टोनपासून व्हायचंय मुक्त... मग या घरगुती उपायांचा करा अवलंब title=

मुंबई - किडनी स्टोन (kidney stone) म्हणजे मुतखडा. किडनी स्टोनचा त्रास आजकाल अनेकांना होताना दिसत आहे. किडनी स्टोनमुळे पोटात अनेक वेळा असह्य वेदना होतात. अशावेळी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचारही घ्यावे लागतात. काही रुग्णांना तर किडनी स्टोरसाठी ऑपरेशनही करावं लागतं. पण काही घरगुती उपाय (home remedies) केल्यास आपल्याला किडनी स्टोनपासून आराम मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला असे 3 पेय (drink) सांगणार आहोत, या पेयाचं सेवन नियमित केल्यास किडनी स्टोनची समस्या दूर होऊ शकते.

1. लिंबू आणि सफरचंद व्हिनेगर
लिंबू आणि सफरचंद व्हिनेगर याचं सेवन केल्यास तुम्हाला किडनी स्टोनपासून मुक्तता मिळू शकते. सफरचंद व्हिनेगरमधील अॅसिडमुळे किडनीमधील स्टोन विरघळण्यास मदत होते. तसंच स्टोनचा आकारही छोटा होतो. त्यामुळे लघवी वाटे हा स्टोन आपल्या शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

असा तयार करा हा पेय
एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा सफरचंद व्हिनेगरचं मिश्रण तयार करा. हे पेय नियमित घेतल्यास तुम्हाला नक्की याचा फायदा होईल.

2. लिंबू आणि तुळस
तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदातही तुळशीला खूप महत्त्व आहे. या पेयामध्ये गव्हाच्या रसाचा समावेश केल्यास याचा दुप्पट फायदा होतो. एक ग्लास गव्हाचा रस यात एक चमचा लिंबू आणि तुळशीचा रस असं मिश्रण तयार करा. हे पेय सकाळी लघवीला जाण्यापूर्वी घ्या. हे हेल्दी पेय रोज नियमित घेतल्यास किडनी स्टोन शरीराबाहेर पडण्यास मदत होईल.

3. लिंबू आणि पुदिना
या पेयानेही किडन स्टोनवर मात करण्यास खूप फायदा होतो. तसंच लिंबू आणि पुदीना यांच्यामधील गुणधर्मामुळे किडनी स्टोनमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होते. पुदिनाच्या पानाचा रस काढून घ्या आणि यात एक लिंबूचा रस मिक्स करा. जर तुम्हाला वरच्यावर किडनी स्टोनची समस्या असेल तर या पेयाचं नियमित सेवन तुम्हाला फायदेशीर ठरतं.