Kitchen Tips In Marathi: आजारांपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती दीर्घकाळापर्यंत आजारांपासून लांब राहतो. सफरचंद खात असताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ते म्हणजे कापल्यानंतर लगेचच सफरचंद खावे लागते. अन्यथा त्यावर हळहळू तांबूस व काळा रंग चढू लागतो. बाहेर जाताना सफरचंद कापून नेल्यावर ते काळे पडलेले सफरचंद पाहून खाण्याचा मूडच खराब होतो. अशावेळी सफरचंद कापल्यानंतर ते लगेचच खावे लागते. पण आम्ही तुम्हाला सफरचंद दीर्घकाळापर्यंत फ्रेश ठेवण्याचे काही उपाय सांगणार आहोत.
सफरचंद कापल्यानंतर त्यातील असलेले एन्झाइमचा हवेशी संपर्क येतो. त्यामुळं त्याचा रंग बदलण्यास सुरुवात होते. ही सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळं ती थांबवणे शक्य नाहीये. पण काही उपाय वापरुन तुम्ही दीर्घकाळापर्यंत सफरचंदाचा रंग बदलण्यापासून थांबवू शकता. जाणून घ्या सिंपल ट्रिक
लिंबाच्या रसाची मदत घेऊन तुम्ही दीर्घकाळापर्यंत सफरचंद फ्रेश ठेवू शकता. कारण लिंबात साइट्रिक अॅसिड असते. सफरचंद कापल्यानंतर काही वेळ स्टोअर करायचे असेल तर त्यावर लिंबाचा रस लावून ठेवा.
सफरचंद तपकिरी होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही मीठाच्या पाण्याचा वापर करु शकता. त्यासाठी काही वेळांसाठी सफरचंदाचे तुकडे मीठाच्या पाण्यात ठेवून द्या. त्यानंतर खाण्याच्या आधी सफरचंदाचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने सफरचंदाचा नैसर्गिक रंग आणि चवही बदलणार नाही.
सफरचंद थंड पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याची तपकिरी पडण्याची प्रक्रिया थोडी कमी होते. काही मिनिटांसाठी सफरचंदाचे तुकडे बर्फाच्या पाण्यात भिजवून ठेवा. व सफरचंद खाण्यापूर्वी टिश्यूने स्वच्छ सुकवून घ्या. सफरचंदाचे काप दीर्घकाळापर्यंत फ्रेश ठेवण्याचा सोप्पा उपाय आहे.
जेवणात वापरण्यात येणारा व्हिनेगर सफरचंद फ्रेश ठेवण्यासाठी सगळ्यात भारी उपाय आहे. पाण्यात थोडा व्हिनेगर मिक्स करुन घ्या. त्यानंतर त्यात सफरचंदाचे तुकडे टाकून ठेवा. यामुळं सफरचंदाच्या फोडी फ्रेश राहतील तसंच, चवही बिघडणार नाही.
सफरचंद कापून तुम्हाला डब्यात घेऊन जायचे असेल किंवा 10 ते 12 तासांसाठी तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या. सफरचंदाची साल काढू नका, सफरचंद कापल्यानंतर एका एअर टाइट कंटेनरमध्ये पॅक करुन ठेवा, सफरचंद कापल्यानंतर प्लास्टिक पिशवीत बंद करुन ठेवा.