जेवल्यानंतर वॉक करण्याचा कंटाळा धोकादायक, कारण....

नियमितपणे चालणं हे आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.

Updated: Jul 7, 2021, 06:19 PM IST
जेवल्यानंतर वॉक करण्याचा कंटाळा धोकादायक, कारण.... title=

मुंबई :  जेवल्यानंतर काही जण जागीच पेंग देतात. जेवल्या जेवल्या जागीच झोपणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जेवल्यानंतर झोपल्याने अनेक समस्या उद्भवतात. ज्यामुळे आरोग्यसंदर्भात अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये मळमळ आणि एसीडीटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे दररोज चालणं आवश्यक आहे. 
जेवल्यानंतर दररोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. जेवल्यानंतर काही पावलं चालल्याने फिट राहण्यास हातभार लागतो. तसेच याचे अनेक फायदेही  आहेत. (know the benefits of walking 10 minutes after eating)

चालण्याचे फायदे

वॉक केल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होतो. एका स्टडीत 30 हजार लोकांवर याची चाचणी घेण्यात आली. त्या स्टडीनुसार दररोज 30 मिनिटं चालल्याने हृद्याशी संबंधित आजार होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी कमी होते.

चालण्याची पद्धत

जेवल्यांनतर काही जण हे जोरजोरात चालतात. अनेक जण तर गार्डनमधील ओपन जीममध्ये वर्कआऊट करतात. वेगात चालल्याने पोटदुखी तसेच सूज येण्याची शक्यता आहे. जेवल्यानंतर 5 ते 6 मिनिटं संथ गतीने चाला. काही दिवस दररोज अशाच प्रकारे वॉक करा. त्यानंतर पुढील काही दिवस तुम्ही 10 मिनिटं चालू शकता. वॉकिंगसाठी घराबाहेर पडण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही घरातही येरझाऱ्या घालू शकता.  

वॉकिंगचे फायदे

वॉकिंग केल्याने पाचनशक्ती मजबूत होते. नियमितरित्या वॉक केल्याने मेटाबॉलिज्म वाढतो तसेच कॅलरीही बर्न होतात. तसेच रक्ताभिसरणही योग्य प्रकारे होतं. यामुळे तुम्हाला आळसमुक्त होवून तरतरी जाणवते. 

जेवल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णाला जेवल्यानंतर चालण्याचा सल्ला दिला जातो. काही स्टडीनुसार, जेवल्यानंतर वॉकिंग केल्याने शुगर लेव्हल प्रमाणात राहण्यास मदत होते.