लिंब आरोग्यास अत्यंत गुणकारी

लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे.

Updated: Jun 12, 2019, 04:00 PM IST
लिंब आरोग्यास अत्यंत गुणकारी title=

मुंबई : लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते.

- पोट दुखत असेल तर आले आणि लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. त्यामुळे पोटदुखी थांबते.

- उलटीचा त्रास होत असेल तर लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास उलटी थांबते. अजीर्ण होत असेल तर लिंबू फार उपयुक्त आहे.

- पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. त्याचप्रमाणे अन्न पचण्यास मदत होते.

- लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस पाण्यातून घेतल्याने खूप फायदा होतो.

- वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच उलटी थांबण्यास मदत होते

- अंगाला खाज सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून चोळावा.