मुंबई : महाराष्ट्रात शनिवारीही कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये घट दिसून आली. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 2971 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील बाधितांची संख्या 79,82,334 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1,47,934 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 3,515 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून बरं झालेल्या लोकांची एकूण संख्या 78,15,953 झाली आहे. राज्यात आज 97.85% व मृत्यू दर 1.85% नोंदवला गेला. सध्या राज्यात 23,447 एक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे 811 नवीन रुग्ण आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह, शहरातील बाधितांची संख्या 1,114,281 वर गेली असून मृतांची संख्या 19,614 वर पोहोचली आहे.
शहरात 1,909 लोक या कोरोनामुक्त झाले आहेत. यासह, साथीच्या आजारातून बरं झालेल्या लोकांची संख्या 1,086,057 झाली आहे. सध्या शहरात 8,610 एक्टिव्ह रुग्ण आहेत.