Health Tips In Marathi: भूक लागणे हे चांगल्या आरोग्याचे संकेत मानले जाते. त्यामुळं अचानक भूक न लागणे, जेवण न करणे, अन्नावरुन मन उडून जाणे, असं घडू लागल्यामुळं चिंता वाटू लागते. सुरुवातीला जरी हे सामान्य वाटत असलं तरी खरंतर भूक न लागणे हे काही आजारांचे संकेत असू शकतात. काही महत्त्वपूर्ण घटना झाल्यानंतर भूक आणि झोप न लागणे असं घडू शकतं. पण सातत्याने असं घडत असेल तर काळजी करण्याचे कारण आहे. कारण हे आजाराचे संकेत असू शकतात.
तुम्हाला कित्येक दिवस भूक लागण्याची जाणीव होत नसेल तर हा चिंतेचा विषय असू शकतो. अन्नावरुन मन उडून गेले तर यामागे काही कारणे असू शकतात. मानसिक आरोग्य, थायरॉइड यासारख्या समस्या असू शकतात. जाणून घेऊया याची कारणे
थायरॉइड ही एक ग्रंथी आहे. जी हार्मोन उत्पादन करते ज्यामुळं शरीरातील महत्त्वपूर्ण कामावर नियंत्रण येते. जेव्हा थायरॉइडचे संतुलन बिघडले तर हार्मोन्सचे उत्पादन कमी होऊ शकते. ज्यामुळं भूक न लागणे, वजन वाढणे, थकवा आणि अन्य लक्षणे असू शकतात.
कॅन्सर एक गंभीर आजार आहे. जो शरीराच्या कोणत्याही भागात पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. जसे की फुफ्फुसाचा कर्करोग, कोलन कर्करोग, स्तनाचा कर्करोग असे अनेक प्रकार आहेत. कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये भूक न लागणे हे लक्षण दिसू लागते.
खाण्या-पिण्यासंबंधी डिसऑर्डर जसं की अॅनोरेक्सिया नर्वोसा आणि बुलिमिया नर्वोसा, भुक न लागण्याचे कारण बनू शकतात. या विकारांमुळं पीडित असलेले लोक नेहमीच जेवण टाळतात किंवा खूप कमी खातात.
मानसिक आरोग्यासंबंधी समस्या जसं की एग्जाइटी आणि डिप्रेशन यामुळं भूक न लागणे असं घडू शकते. या समस्यांमुळं पीडित असलेले लोकांना अनेकदा जेवण टाळतात.
अचानक भूक न लागणे किंवा जेवण कमी जाणे यामागे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असू शकतात. आईबीडी, गॅस्ट्रिटिस आणि पेप्टिक अल्सरसारख्या समस्यांमुळं पाचनसंस्था बिघडते. ज्यात वेदना वाढतात आणि भूक कमी लागते. त्यामुळं पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)