आंबाप्रेमींनो आंबा खाल्यानंतर या 5 गोष्टी लगेच खाऊ नका

आंबा खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात असू द्या.

Updated: May 27, 2022, 09:40 PM IST
आंबाप्रेमींनो आंबा खाल्यानंतर या 5 गोष्टी लगेच खाऊ नका title=

मुंबई : उन्हाळ्य़ात आंबे हे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. आंबा हा अनेकांचं आवडीचं फळ. वर्षभर आंबाप्रेमी याची वाट पाहत असतात. आंब्याला कितीही भाव द्यावा लागला तरी लोक तो खाणे सोडत नाहीत. शेवटी त्यामुळेच त्याला फळांचा राजा म्हणतात. 

लोक आंब्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात आणि खातात. अर्थात त्याची चव अप्रतिम असते. पण आंबा खाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.

आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसह फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पण त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत आणि ते खाल्ल्यानंतर लगेच काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्यास त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. चला जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आंबा खाल्ल्यानंतर लगेच खाण्यास मनाई आहे.

पाणी

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे महागात पडू शकते. आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये पोटदुखी, अपचन, पोट फुगणे, आम्लपित्त यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका हे लक्षात ठेवा.

दही

तुम्ही दही आणि आंबा एकत्र खात असाल तर ते चुकीचे आहे. आंबा सोबत दही खाल्ल्याने तुमच्या पोटाचे आणि त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. आंबा गरम तर दही थंड असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र खाल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

कोल्ड्रींग

जर तुम्ही डायबेटीसचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की आंबा खाल्ल्यानंतर लगेच कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका. कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्समध्ये साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

कारले

क्वचितच कोणी आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खात असेल, परंतु जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्याने पोटातील ऍसिडिटी वाढते. अशा स्थितीत तुम्हाला उलट्या, मळमळ आणि धाप लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मसालेदार अन्न

चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येऊ नयेत, अशी तुमची इच्छा असेल, तर आंबा खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ कधीही खाऊ नका. यामुळे पोटात उष्णता वाढते, जी नंतर चेहऱ्यावर मुरुम म्हणून दिसू शकते.