चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी 'या' मेडिकल टेस्ट नक्की करून घ्या

Chardham Yatra : हिंदू धर्मात चार धाम यात्रेला मोठं महत्त्व दिलं जातं. असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होतात. 10 मे पासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून  गेल्या चार दिवसांमध्ये आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.   

Updated: May 15, 2024, 08:19 PM IST
चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी 'या' मेडिकल टेस्ट नक्की करून घ्या title=

Medical test For Chardham Yatra : यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चार धाम यात्रेतील मुख्य ठिकाणं मानली जातात. हिमालय पर्वतरांगांमध्ये स्थित असलेल्या या ठिकाणच्या वाटा अरुंद असल्यामुळे 45 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना थंडीत नाहक स्वत:चा जीव गमवावा लागला. कच्चा रस्ता अवघड पायवाट आणि हाडं गोठवणारी थंडी या सगळ्याने जीव गमवण्याची शक्यता जास्त असते. उत्तराखंडला धार्मिकदृष्ट्या मोठं महत्व आहे, त्याचबरोबर येथील  निसर्गसौंदर्य मोहून टाकणारं असलं तरी येथे जाणारी वाट अवघड आहे.  

हिमालय पर्वतरांगांमुळे उत्तराखंड आणि आसपासचं भौगोलिक वातावरणात अतिरिक्त थंडावा असल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला चारधाम यात्रेला जात असाल तर आरोग्याची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. 

कोलेस्ट्रॉलची तपासणी
 

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास तुम्ही चार धाम यात्रेला जाणं न जाणं फायदेशीर ठरेल.

अतिउच्च रक्तदाब 

अतिउच्च रक्तदाबामुळे हृदयावर मोठ्या प्रमाणात ताण येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जर मधुमेहाचा त्रास असल्यास चार धाम यात्रेला न जाण्याचा सल्ला दिला जातो. 

श्वसनाचा आजार

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ सर करताना ऑक्सिजन कमी कमी होत जातो, त्यामुळे अस्थमा आणि दमा यासारखे श्वसनाचे आजार असल्यास चार धाम यात्रेला न जाणं फायदेशीर ठरेल. 
 
दरम्यान, चारधाम यात्रेचं नियोजन करताना स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी पुरेसं पाणी शरीरात जाणं गरजेचं आहे. प्रवासात मेडिकल किट, शरीराला उष्णता देणारे पदार्थ सोबत ठेवणं फायदेशीर आहे. अमरनाथ किंवा चार धाम यात्रेला जाणारे भाविकांची संख्या दरवर्षी वाढत जात असून याचा परिणाम उत्तराखंड येथील व्यवस्थापनावर होत असल्याचं उत्तराखंडचे डीजीपी अभिनव कुमार यांनी माहिती दिली आहे. वय वर्ष 50 च्या पुढील भाविकांनी चार धाम यात्रेला जाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असा सल्ला उत्तराखंडच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.