मुख्यमंत्री : कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही असं तज्ज्ञांकडून सातत्याने सांगण्यात आलं आहे. यामध्येच आता मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि दिग्गज अब्जाधीश बिल गेट्स यांनी कोरोनासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. संपूर्ण जगाने अजून कोरोना महामारीच्या सर्वात वाईट टप्प्याला तोंड दिलेलं नाही, असं बिल गेट्स यांचं म्हणणं आहे.
बिल गेट्स म्हणाले की, आतापर्यंत आपल्याला सरासरीच्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त धोका जाणवलेला नाही. कोरोनाचा अधिक संसर्गजन्य आणि अधिक घातक व्हेरिएंट येण्याचा धोका आहे. त्यामुळे या महामारीचा सर्वात वाईट टप्पा अजून पाहायचा बाकी आहे.
बिल गेट्स यांनी असा इशारा यापूर्वीही दिला होता. डिसेंबर 2021 मध्येही बिल गेट्स यांनी म्हटलेलं की, कोरोना महामारीचा सर्वात वाईट टप्पा अजून संपलेला नाही. 2015 साली मी इशारा दिला होता की जग अजून पुढच्या महामारीसाठी तयार नाही.
एका मुलाखतीत बिल गेट्स म्हणाले, "आपण अजूनही कोरोना महामारी धोक्यात आहोत. यामुळे एक व्हेरिएंट येऊ शकतो जो अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक असेल."
मला जगाला घाबरवायचं नाही पण आतापर्यंत आपण कोरोनाच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना केलेला नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून जगभरात सुमारे 62 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या या आकड्यांमध्ये घट होताना दिसतेय.
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला होता की, लोकांना अजूनही कोरोनासंदर्भात काळजी करण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये चाचणीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे व्हायरस पुन्हा उद्भवण्याचा धोका आहे.