Home Remedies for Morning Sickness: महिलांना गरोदरपणात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनेकदा थकवा येणे, अंगदुखी, उलट्या होणे असे (Pregnancy Tips) अनेक शारीरिक त्रास सतावतात तेव्हा अशावेळी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा गरोदर महिला या वर्किंगही (Working Pregnant Women) असतात. त्यांना ऑफिसच्या शिफ्टमध्येही हा त्रास होऊ शकतो. अनेकदा महिलांना सकाळी सकाळी उलट्यांचा त्रास होतो आणि अवस्थही वाटते. तेव्हा जाणून घेऊया की अशावेळी गरोदर महिलांनी कशी (Morning Sickness in Pregnancy) काळजी घ्यावी आणि जर का सकाळी उलट्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही काही घरगुती उपायही फॉलो करू शकता. घरच्या साहित्यांचा वापर करून तुम्ही त्याचा वापर तुमच्या आहारात करू शकता.
आपल्याला हल्ली आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यातून गर्भवती महिलांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेच आहे. तुम्हाला अनेकदा सकाळी अवस्थतेलाही (What are the Tips of Morning Sickness) सामोरे जावे लागते. आजच्या महिला या वर्किंग असतात तेव्हा त्यांना ऑफिसला जाता जाता प्रवासादरम्यानही त्रास होऊ शकतो. अशावेळी आपल्याकडे योग्य त्या खाण्यापिण्याच्या गोष्टीही असणे आवश्यक असते. त्यातून जेवणातही योग्य ते बदल करून घ्यावे लागतात. तुम्हाला जेवणात जास्त आयरन असलेले पदार्थ घेता येतात. शक्यतो ताकद वाढविणाऱ्या गोष्टी खाणं गरजेचे आहे.
प्रेग्नन्सीमध्ये सुरूवातीला तुम्हाला हॉर्मोनल बदलांमुळे (Diet for Pregnancy) त्रास होतो. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी उलट्या होण्याचा त्रास अनेकदा होतो. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. एव्हाना तुमची मासिक पाळी बंद होते त्यातून प्रेग्नन्सीच्या पाचव्या आठवड्यानंतर हा त्रास सुरू होतो.
यावेळी तुम्हाला व्हिटॅमिन सी (Vitamin C) असलेले पदार्थ खाऊ शकता ज्यानं तुमची ताकद वाढते. तेव्हा अशावेळी फळं खा. आयरन असलेले पदार्थ खा. ज्यात तुन्ही पालेभाज्या खाऊ शकता. तुम्हाला जास्त मळमळ आणि उलट्या होत असतील तर तुम्ही पुदिना आणि आलं खाऊ शकता. अशावेळी लिंबू पाणीही पिऊ शकता. अनेकांनी मार्निंग वॉकला जाण्याची सवय असतेच. तेव्हा त्यावेळी तशाप्रकारे विटॅमिन सी असणार ज्यूसेस बरोबर ठेवणं गरजेचे आहे. अनेकदा नाश्त्याच्या वेळीही काही खाल्लं की उलटयांचा त्रास होतो त्याचसोबत रिकामी पोटीही होऊ शकतो.
गरोदरपणात आपल्या शरीराच्या अवस्थेनुसार आपल्याला त्रास होतो. परंतु योग्य आहार आणि व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)