कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...

जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील. 

Updated: Oct 11, 2022, 04:54 PM IST
कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत... title=
Must try these remedies for weak eyes nz

Eyesight Increasing Home Remedies: बदलत्या काळानुसार, जर कोणतीही समस्या सर्वात सामान्य होत असेल तर ती म्हणजे डोळे कमजोर होणे. मोबाईल (Mobile), टेलिव्हिजन (television), लॅपटॉप (Laptop) किंवा पुस्तकांवर (Books) डोळ्यांचा सतत वापर झाल्यास दृष्टी कमजोर होऊ शकते. (Must try these remedies for weak eyes nz)

जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील. चला वेळ न घालवता जाणून घेऊया काय आहेत ते घरगुती उपाय.

दृष्टी वाढवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies To Increase Eyesight)

1. बदाम (Almonds)

बदामाचे सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही रोज रात्री बदाम भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता. याशिवाय बदाम दुधासोबत खाऊ शकतो.

आणखी वाचा - Amazon Great Indian Festival 2022: बनारसी साडीत खुलवा स्वत:चं सौंदर्य; मौनी रॉय, चिंत्रांगदाचा लूक सहजपणे करा रिक्रिएट

 

2. आवळा (Amla)

आवळ्यात असलेले व्हिटॅमिन सी  (Vitamin C) हे दृष्टी वाढवण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) आणि शक्तिशाली पोषक घटक असतात. तसेच, हे रेटिनल पेशी सुधारण्याचे कार्य करते. आवळ्याच्या रसाचे काही थेंब पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा प्यावे. याशिवाय आवळ्याचा ज्यूसमध्ये मध मिसळून पिऊ शकता.

3. व्हिटॅमिन ए (Vitamin A)

आपल्या आहारात व्हिटॅमिन ए समाविष्ट करणे डोळ्यांसाठी चांगले आहे. व्हिटॅमिन ए मध्ये डोळ्यांच्या काळजीसाठी आवश्यक पोषक असतात. गाजर, पपई, आवळा आणि पालेभाज्या तसेच शिमला मिरचीमध्ये देखील व्हिटॅमिन ए असते.

आणखी वाचा - Fever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल

 

4. ड्राय फ्रुट्स (dry fruits)

बदामाव्यतिरिक्त, मनुका आणि अंजीर हे देखील असे ड्रायफ्रुट्स आहेत जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. यामध्ये आढळणारे पोषक तत्व दृष्टी वाढवण्यास मदत करतात. भिजवून खाल्ल्याने जास्त फायदा होतो.

वरील टिप्स व्यतिरिक्त, डोळे व्यवस्थित स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे. याशिवाय डोळ्यांशी संबंधित व्यायामही करणे तितकेच महत्त्वाचे असते. डोळे कधीच चोळू नका किंवा खाजवू नका, परंतु काही समस्या असल्यास गरम पाण्याने सूती कापडाचा वापर करुन शेक द्यावा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)