मधूमेहींनो ! आहाराविषयी या ५ सल्ल्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका

भारताला मधुमेहाची राजधानी समजली जाते.

Updated: Nov 11, 2017, 03:25 PM IST
मधूमेहींनो ! आहाराविषयी या ५ सल्ल्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका  title=

 मुंबई : भारताला मधुमेहाची राजधानी समजली जाते.

दिवसेंदिवस मधुमेहींची संख्या वाढते आहे. मधुमेह अनुवंशिक आहे. सोबतच तणावग्रस्त जीवनशैलीमुळे हा त्रास झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मधुमेहाचा नायनाट करणं शक्य नसले तरीही आहार, व्यायाम यांच्यासोबत रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. 
 
 आहार हा मधूमेहींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण आटोक्यात ठेवायला मदत करते. पण डाएट सांभाळताना तुम्ही या विनाकारण मिळणार्‍या सल्ल्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 
 
 तुम्ही आहारात कोणतं तेल आणि किती प्रमाणात तेल घेता ? यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वर खाली होत असतं. पण याचा अर्थ आहारातून तेल पूर्णपणे वर्ज्य करावे असे नाही. अनसॅच्युरेटेड फॅट्स आहारात आवश्य आहेत. त्यामुळे ऑलिव्ह ऑईल. सनफ्लॉवर ऑईल या6चा समावेश करा. 
 
 मधूमेहींनी आंबे खाऊ नयेत. असा अनेकांचा समज आहे. परंतू हे पूर्ण सत्य नाही. तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असल्यास तुम्ही दिवसभरातील कॅलरीजचा विचार करून आवडीनुसार प्रमाणात आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. 
 
 भात - आहारात प्रमाणात भाताचा समावेश केल्यास त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झटकन वर- खाली जात नाही. 
 
 मीठ - मधूमेहींनी साखर, मीठ असे दोन्ही पदार्थ प्रमाणात खावेत. सोडियमचा थेट प्रभाव रक्तदाबावर होतो. 
 
 पाव किंवा व्हाईट ब्रेड यांच्याऐवजी मल्टी ग्रेन ब्रेडचा वापर करावा. त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. असा सल्ला दिला तरीही मल्टीग्रेन ब्रेडदेखील प्रमाणात आहारात घ्यावा.