मुंबई : Spondylosis Symptoms And Treatment: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला. स्पॉन्डिलायसिस (Spondylosis Symptoms And Treatment) या आजाराने त्या त्रस्त आहेत. मुंबईत सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. न्यायालयीन कोठडीत हा आजार बळावला.
नवनीत राणा यांच्या स्पॉन्डिलायसिस आजाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हा आजार कोणता आणि त्यावर उपचार काय, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. खरं तर, हा एक सामान्य आजार आहे. एक प्रकारे याला गठिया रोग असेही म्हणतात. या दरम्यान, कंबरेपासून वेदना सुरु होते आणि पाठ आणि मानेमध्ये जडपणा जाणवतो. याशिवाय शरीराच्या बहुतांश भागात वेदना होतात. यासोबतच मणक्यातील जडपणा राहतो. काहीवेळा रुग्णांना एवढ्या वेदना होतात की त्यांना शस्त्रक्रिया देखील करावी लागते.
भारतात दरवर्षी या आजाराची 10 लाख रुग्ण नोंदवले जातात. या आजाराबाद्दल जाणून घेऊया त्याची इतर लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपचार काय आहेत.
स्पॉन्डिलायसिसमध्ये, वेदना प्रामुख्याने कंबरेपासून सुरु होते. हे वयाच्या 16 व्या वर्षी देखील सुरू होऊ शकते. वयानुसार हा आजार खूप त्रास देऊ लागतो. यामुळे काही वेळा तुमच्या हृदयावरही परिणाम होतो. सहसा याची तक्रार 45 वर्षांखालील पुरुष आणि महिलांमध्ये दिसून येते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, HLA-B27 चाचणी करुन स्पॉन्डिलोसिस रोगाचा शोध लावला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की HLA-B27 हा एक प्रकारचा जनुक आहे, जो रक्त तपासणीद्वारे शोधला जातो. यामध्ये रक्ताचा नमुना घेऊन त्याची लॅबमध्ये चाचणी केली जाते. याशिवाय एमआरआयमध्ये स्पॉन्डिलोसिसचाही खुलासा होतो.
या आजारासाठी औषधांचा आधार घेऊन जगावे लागते. याशिवाय स्नायू शिथिल करणारे आणि स्टिरॉइड इंजेक्शन्सचीही मदत घेता येते. यासोबतच रुग्ण फिजिओथेरपीही घेतात. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते.