नैसर्गिक उपाय असले तरीही हे '6' पदार्थ चेहर्‍यावर लावू नका

लहान मोठ्या स्वरूपाचं दुखणं असेल तर सहाजिकच डॉक्टरांकडे न जाता सुरूवातीला केवळ नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले जातात. 

Updated: Nov 20, 2017, 08:19 AM IST
नैसर्गिक उपाय असले तरीही हे '6' पदार्थ चेहर्‍यावर लावू नका  title=

मुंबई : लहान मोठ्या स्वरूपाचं दुखणं असेल तर सहाजिकच डॉक्टरांकडे न जाता सुरूवातीला केवळ नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले जातात. 

आजारपणाप्रमाणेच चेहर्‍यावरील डाग, अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठीही घरगुती उपाय केले जातात. पण असे केल्याने काही वेळेस चेहर्‍यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणूनच कॉस्मोटोलॉजिस्ट डॉ. नमिता दास यांनी सुचवलेले हे नैसर्गिक पदार्थ चेहर्‍यावर थेट वापरणं टाळा.   

अल्कोहल - 

त्वचा खूपच तेलकट असेल तर अल्कोहल वापरून त्वचा शुष्क केली जाते.पण चेहर्‍यावर अल्कोहल चोळल्याने त्वचेतील अत्यावश्यक लिपिड्स, प्रोटीन्स आणि फॅट्स निघून जातात. परिणामी त्वचेतील दाह वाढण्याचा धोका असतो.   

मेयॉनीज - 

त्वचेतील मॉईश्चरायझर टिकून राहण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या मॉईश्चरायझरचाच वापर करा. कारण मेयॉनीझचा वापर केल्यास त्वचेतील छिद्र क्लॉग होऊ शकतात. परिणामी अ‍ॅक्नेचा त्रास वाढू शकतात.  

कच्ची अंडी - 

अंड्याचा मास्क बनवून चेहर्‍यावर लावल्यास पोअर्स टाईट होण्यास मदत होते. तसेच अनावश्यक केस काढले जातात. असा सल्ला अनेक  ठिकाणी वाचायला, बघायला मिळतो. पण अंड्यातील बॅक्टेरियांचे प्रमाण  फूड पॉयझनिंग करण्यास कारणीभूत ठरते. परिणामी त्यामुळे त्रासदेखील होऊ शकतो. 

लिंबाचा रस - 

लिंबाचा रस टॅनिंग कमी करण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी वापरा असा सल्ला दिला जातो. परंतू त्यामधील अ‍ॅसिडीक घटक त्वचेचे नुकसान करू शकतात. अनेकदा फेस पॅकमध्येही लिंबाचा रस असल्यास त्वचेमध्ये जळजळ जाणवते. 

बेकिंग सोडा - 

प्रामुख्याने अ‍ॅक्नेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. परंतू त्यामधील घटक त्वचेतील  pH पातळीचं नुकसान करतात. परिणामी त्वचेमध्ये जळजळ, खाज येणं अशा समस्या वाढतात. 

दालचिनी - 

मसाल्याचा वापर करून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं असा  सल्ला दिला जातो. पण दालचिनीमुळे त्वचेतील जळजळ वाढते. त्वचेतील  pH पातळीचं नुकसान होतं.