चीनमध्ये आणखी एका आजाराचा संसर्ग; जाणून घ्या लक्षणे

चीनमध्ये आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे.   

Updated: Sep 19, 2020, 10:11 PM IST
चीनमध्ये आणखी एका आजाराचा संसर्ग; जाणून घ्या लक्षणे

नवी दिल्ली :  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना या विषाणूवर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मात्र चीनमध्ये उदयास आलेला व्हायरस नाहीसा होत नाही तर चीनमध्ये आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजाराचा संसर्ग बॅक्टेरियल इंफेक्शन (Bacterial Infection)मुळे झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. गांसू प्रांताची राजधानी लान्झोऊच्या आरोग्य आयोगाच्या सांगण्यानुसार याठिकाणी २ हजार २४५ लोकांना ब्रुसेलोसिसची लागण झाली आहे. 

आयोगाच्या म्हणण्यानुसार, ब्रुसेलोसिस या आजाराचा संसर्ग पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे होत आहे. परंतु आतापर्यंत कोणाचाही या आजारामुळे मृत्यू झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी शहरातील २९ लाख लोकसंख्येपैकी २१ हजार ८४७ लोकांची चाचणी केली आहे.

डोकेदुखी, स्नायू वेदना ताप आणि थकवा ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या डिसीज कंट्रोल एन्ड प्रिव्हेंशन सेंटर नुसार हा आजार कोरोना व्हायरस प्रमाणे नाही. या आजाराला Malta fever किंवा Mediterranean fever या आजाराने देखील ओळखलं जातं.