काळी मिरीचे आरोग्यास होणारे फायदे

मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे.  

Updated: Sep 17, 2020, 11:08 PM IST
काळी मिरीचे आरोग्यास होणारे फायदे title=

मुंबई : मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे. मात्र या काळी मिरीचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत.  कोमट पाण्यामध्ये काळी मिरी टाकून प्यायल्यास आरोग्याला त्याचा लाभ होतो. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीमायक्रोबीयल (antimicrobia) गुणधर्मांनी युक्त असा हा मसाल्याचा पदार्थ ट्युमरच्या वाढीला नियंत्रित करतो. मेंदूला नवे तेज प्राप्त होऊन तो सतेज होतो. तसंच त्यात अँटीडिप्रेसंट (anti-depressant) गुणधर्म असतात.

गॅसची समस्या
गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.

सर्दी
काळी मिरी सर्दीसाठी देखील लाभदायक आहे. गरम दूधमध्ये काळी मिरी टाकून प्यायल्याने आराम मिळतो. 

खोकला
खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.