Omicron चं नवीन लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागांवर होतोय परिणाम

देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहचली आहे, अशात ओमायक्रॉनची नविन लक्षणं समोर आली आहेत

Updated: Jan 25, 2022, 09:31 PM IST
Omicron चं नवीन लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागांवर होतोय परिणाम title=
संग्रहित फोटो

Coronavirus New Symptom : देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) शिगेला पोहोचली आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने २ ते २.५ लाखांचा टप्पा गाठला आहे. अशात एक चिंताजनक बातमी आहे. ओमायक्रॉनची (Omicron) नवीन लक्षणं समोर आली आहेत. 

संशोधनात आढळली नवीन लक्षणं 
ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करण्यात येत असलेल्या संशोधनात नवीन लक्षणे (Coronavirus New Symptom) समोर आली आहेत. या व्हेरिएंटमुळे मेंदू, हृदय आणि डोळे तसंच कानांवरही परिणाम होत असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं, यासोबतच या प्रकाराचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये थंडी वाजून येणे यासारखी लक्षणेही दिसून आली आहेत.

कमी ऐकू येण्याची समस्या
अहवालानुसार, ज्या रुग्णांमध्ये अशी समस्या दिसली, त्यापैकी बहुतेकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारावर संशोधन करणाऱ्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला गेल्या काही दिवसांपासून अचानक कानात दुखणं सुरू झाले असेल, मुंग्या येणं, ऐकू येणं कमी झाले असेल किंवा चक्कर येण सुरू झाले असेल, तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

नवीन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत रुग्णाने ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करून घ्यावी. कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांमध्ये ही सर्व लक्षणे दिसून आली आहेत. विशेषत: कानाने ऐकू येणं अचानक कमी होणं ही लक्षणं अधिक दिसून आली आहेत. अशी लक्षण दिसत असली तरी ती उपचारानंतर बरी होऊ शकतात.

आतड्यांवर करतोय हल्ला
प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी केलेल्या दाव्यानुसार ओमायक्रॉन व्हेरिएंटचा परिणाम आतड्यांवरही होऊ शकतो. जर तुम्हाला वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल तर हे लक्षण तात्काळ डॉक्टरांना सांगावं.