मुंबई : उकाडा जसजसा वाढतोय, तशा घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अशा वेळी अनेक जण डिओड्रण्ट किंवा परफ्यूमचा भरपूर वापर करतात. घामाचा वास मारावा आणि आपण जाऊ तिथे प्रसन्न वातावरण निर्माण करावे, हा अनेकांचा उद्देश असतो. त्यासाठी दिवसातून चार-पाच वेळा डिओ फवारणारेही अनेक जण असतात. मात्र डिओ किंवा पर्फ्यूमच्या अतिवापरामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो, अशी माहिती आता समोर आलीये...
पर्फ्यूम किंवा डिओने का होऊ शकतो कॅन्सर?
१. पर्फ्यूम तयार करताना किंवा सुवास दीर्घकाळ टिकावा, यासाठी त्यामध्ये विविध प्रकारची केमिकल्स मिसळली जातात.
२. मात्र या रसायनांमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर ईजा पोहोचू शकते.
३. तज्ज्ञांच्या मते काही कंपन्या फ्थेलेट्स, मस्क किटोन आणि फॉर्मल डिहाईड यासारखी रसायनांचा वापर करतात.
४. फ्थेलेट्सवर अनेक देशांमध्ये बंदी आहे.
५. याच्या अतिवापरामुळे मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
६. मस्क किटोन हे मातेच्या दुधात मिसळलं जातं. त्यामुळे नवजात अर्भकांसाठी ते धोकादायक ठरतं.
७. याखेरीज डिओ, पर्फ्यूममध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेचे गंभीर विकार होण्याची भीती असते.
उन्हाळ्यात अनेक डिओ कंपन्या आकर्षक जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करतात. वादळ आले तरी फ्रेग्रन्स म्हणजेच सुवास कसा कायम राहतो इथपासून ते मुली कशा आकर्षित होतात इथपर्यंत अनेक गूण सांगितले जातात. मात्र डिओ, पर्फ्यूमच्या अतिवापर केल्यास तुम्हाला कर्करोगासारखा गंभीर आजारही होऊ शकतो.