PCOSचा त्रास असलेल्या महिलांनी असा घ्यावा आहार!

अनियमित मासिक पाळी ही समस्या अनेक महिलांमध्ये आढळून येते.

Updated: Jul 19, 2021, 02:37 PM IST
PCOSचा त्रास असलेल्या महिलांनी असा घ्यावा आहार! title=

मुंबई : अनियमित मासिक पाळी ही समस्या अनेक महिलांमध्ये आढळून येते. अनेक महिलांना पाळी दर महिन्यामध्ये उशिरा येते. अशा महिलांपैकी अधिक महिलांना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या असण्याची शक्यता असते.

काय आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम?

या समस्येत हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होतं. याचा परिणाम मासिक पाळीवर होतो आणि अनेक महिलांना मासिक पाळी उशिरा येते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या आजारात वजन आणि रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. म्हणून यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ही समस्या असल्यास वजन निंयत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. याशिवाय ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी चेरी, जर्दाळू, संत्री खाणं उपयुक्त ठरतं.”

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममध्ये आहाराच्या टीप्स

  • भरपूर पाणी प्या
  • अंड्यांचं सॅन्डविच, दूध, चपाती, सलाड, पनीर, सूप या पदार्थांचं सेवन करा
  • चहा आणि कॉफी पिण्यापेक्षा ग्रीन टी प्या
  • तळलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाऊ नका
  • रेड मीट खाणं टाळा
  • बेकरीतील पदार्थ खाणं टाळा. जसं की, पेस्ट्री, खारी, टोस्ट, केक.
  • सलाड खा
  • तिखट आणि मीठाचे पदार्थ खाणं टाळा
  • वजन नियंत्रणात ठेवा
  • भाजलेले सोयबीन, बेसनचा पोळा हे पदार्थ खावेत
  • दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा.
  • पायी चाला आणि योगा करा