पूनम पांडेने बरोबर केलं की चूक? डॉ. अनिल ठकवानी म्हणतात 'कर्करोगाशी लढा देणाऱ्या...'

Poonam Pandey Death News : शारदा रुग्णालयाचे डॉक्टर अनिल ठकवानी यांनीही पूनम पांडेने केलेली कृती शंभर टक्के चुकीचं असल्याचं म्हटलंय. (Doctor Thakwani On cervical cancer)

सौरभ तळेकर | Updated: Feb 3, 2024, 07:16 PM IST
पूनम पांडेने बरोबर केलं की चूक? डॉ. अनिल ठकवानी म्हणतात 'कर्करोगाशी लढा देणाऱ्या...' title=
Poonam Pandey death hoax

Doctor Thakwani On cervical cancer :  शुक्रवारी 32 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey Death News) निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. पूनमच्या मृत्यूचं कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) असल्याचं सांगण्यात आलं होतं. तिच्या टीमने स्वत: मृत्यूची माहिती दिली होती. मात्र, त्याबाबत ठोस माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे पूनम पांडे जिवंत आहे का? असा सवाल उपस्थित होत होता. अशातच शनिवारी दुपारीस पूनम पांडे हिने स्वत: एक व्हिडीओ (Poonam Pandey Video) शेअर करत आपण जिवंत असल्याचं सांगितलं अन् त्याचं कारण देखील स्पष्ट केलं. 

पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (cervical cancer) झाल्याचं सांगण्यात आलं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला होता. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आपण अशी बातमी पसरवली, असं पूनम पांडेने म्हटलं आहे. पूनमच्या या कृतीनंतर आता अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर आता शारदा रुग्णालयाचे डॉक्टर अनिल ठकवानी यांनीही पूनम पांडेची ही कृती शंभर टक्के चुकीचं असल्याचं म्हटलंय.

अभिनेत्री पूनम पांडेने कर्करोगाच्या रुग्णांची आणि विशेषत: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पीडितांची खिल्ली उडवली आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. या कृतीमुळे नैतिक चिंता वाढली आहे. असं डॉक्टर अनिल ठकवानी (Doctor Anil Thakwani) म्हणतात. पूनमचं वर्तन अतिशय असंवेदनशील आहे. या जीवघेण्या आजाराचा सामना करणाऱ्यांमध्येही यामुळे निराशा वाढते. त्यामुळे लोकांमध्ये दु:खही निर्माण होते. यामुळे कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांमध्ये नकारात्मकता निर्माण होते, असं डॉक्टर म्हणतात.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये सकारात्मकता खूप उपयुक्त आहे. पण पूनम पांडेने त्याची खिल्ली उडवली. आम्ही अशा कृत्यांचा निषेध करणं आणि या आजाराशी लढा देणाऱ्या महिलांना हिंमत देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही डॉक्टर अनिल ठकवानी यांनी म्हटलं आहे.

'पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट...'; राखी सावंत संतापली

दरम्यान, पूनमने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. यानंतर त्याने 2013 मध्ये नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'आ गया हीरो' आणि 'द जर्नी ऑफ कर्मा' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.