Tips Before Yoga : योगासन करण्याआधी हे काम नका करू, नाहीतर आरोग्याचं होईल फार मोठं नुकसान

Pre Yoga Tips : योगासन करण्याआधी ही गोष्ट करणं टाळा नाहीतर आरोग्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

Updated: Jan 30, 2023, 03:22 PM IST
Tips Before Yoga : योगासन करण्याआधी हे काम नका करू, नाहीतर आरोग्याचं होईल फार मोठं नुकसान title=

Tips Before Yoga : रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होत असल्याचं दिसत आहे. कारण आता ऑफिसमध्ये आठ ते नऊ तास बसून किंवा उभं राहून काम असतं. मात्र याचा शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. अवाढव्य शरीर होत असून त्याची रचनाही कशाही पद्धतीने होत आहे. जिमला जाऊन जड व्यायाम करण्यापेक्षा योगा करण्यावर लोक भर देताना दिसत आहेत. योगासन करण्याआधी ही गोष्ट करणं टाळा नाहीतर आरोग्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. (pre yoga dont do these things before doing yoga otherwise muscle pain latest marathi health news)

योगाचा फायदा करून घ्यायचा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी योगा करा. जर तुम्हाला योगासने करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही प्राणायाम देखील करू शकता, पण लक्षात ठेवा की प्राणायाम करतानाही तुम्हाला कॉफीपासून दूर राहावे लागेल.

हिवाळा सुरू असल्याने बहुतेक लोक अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात, परंतु तज्ञ म्हणतात की योग करण्यापूर्वी आपण गरम पाण्याने आंघोळ करू नये. अन्यथा, स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि आपल्याला वेदना जाणवते. गरम पाण्याने आंघोळ केल्यावर योगासने केल्याने शरीर स्ट्रेचिंग होत नाही, त्यामुळे समस्या दिसून येतात.

झोप घालवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर अनेकजण कॉफी पितात. मात्र जास्त कॉफी पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या स्नायूंमध्ये तणावाची प्रतिक्रिया वाढते. याशिवाय कॉफीच्या अतिसेवनामुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. या दरम्यान योगासने करताना अडचणी येतात.