मुंबई / पुणे : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, कोणताही धोका नको राज्य सरकारने म्हणून 15 जूनपर्यंत ब्रेक दी चेनअंतर्गत कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. दरम्यान, पुण्यातील अपोलो क्लिनीकच्यावतीने कोविड संसर्गामुळे होम आयसोलेशनसारखा पर्याय निवडणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण भासता कामा नये याकरिता क्लिनीकच्यावतीने चोवीस तास वैद्यकिय सेवा दिली जाणार आहे.
होम आयसोलेशनच्या संपूर्ण 14 दिवसाच्या कालावधीत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आज घरी ठेवण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय सहाय्य कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा केली. कोविड -19 बाधित रुग्णांना या पर्यायामुळे घरबसल्या वेळच्या वेळी उपचार मिळणार आहे. होम आयसोलेशनच्या 14 दिवसांच्या या सुविधेमध्ये टेलिफोनिक कन्सल्टेशन, आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला (रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत), आहारतज्ञांचे मार्गदर्शन (पोषण आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता), परिचारींकांद्वारे त्वचारोगांचे दैनंदिन निरीक्षण, श्वसनासंबंधी तक्रारी तसेच फिजीओथेरपीस्टकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.
याचबरोबर संपर्कविरहीत दंत स्वच्छतेविषयी सल्ला व मार्गदर्शन तसेच कशी काळजी घ्यावी, निर्जंतुकीकरणाबाबत असलेली मार्गदर्शक तत्त्वे, औषधांविषयी संपूर्ण माहिती या पॅकेजच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. तसेच पल्मोनोलॉजिस्ट, सीटी स्कॅन सेवा, आरटी-पीसीआर चाचणी आणि मानसशास्त्रज्ञांचा देखील सल्ला फोनच्या माध्यमातून घेतला जाईल. अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी https://www.apolloclinic.com/ वर लाँग इन करा किंवा 1860 500 7788 वर हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेत आणि ज्यांच्यात सौम्य किंवा अति-सौम्य लक्षणं दिसतायत. तर ज्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत, ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं किंवा अजिबात लक्षणं न आढळणाऱ्या म्हणजेच असिम्प्टोमॅटिक रुग्णांना आयसोलेशन म्हणजेच अलगीकरणात ठेवले जाते.