Navratri Garba Tips: नवरात्रीच्या काळात ठिकठिकाणी पूजा मंडप उभारून दांडिया-गरबा उत्सवाचे आयोजन केले जाते. देशाच्या विविध भागात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण कधी कधी गरब्यादरम्यान थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि तब्येत बिघडणे यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.
गेल्या काही वर्षांपासून गरब्याच्या कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे पीडितांमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आता प्रश्न असा पडतो की गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका का येतो आणि तो कसा टाळता येईल? याबाबत डॉक्टरांनी दिलेली माहिती अतिशय आवश्यक आहे.
(हे वृत्त सविस्तर वाचा >>> मुलाबरोबर गरबा खेळताना पुणेकराचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; पाहा Video)
गरबा सारख्या शारीरिक हालचालींदरम्यान हृदयविकाराचा झटका येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याचे एक प्रमुख कारण निदान न झालेले हृदयविकार आहे. जे नृत्याच्या अचानक शारीरिक ताणामुळे होऊ शकते. याशिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, डिहायड्रेशन, रक्तदाब, अतिश्रम आणि झोप न लागणे यासारख्या कारणांमुळे हृदयाला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. गरबा खेळताना हृदयाची गती अचानक वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
अशावेळी गरबा खेळण्याअगोदर काही विशिष्ट पद्धतीने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते.
मुलाबरोबर गरबा खेळताना पुणेकराचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैदhttps://t.co/YzbLRTFg29 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#Garba #Viral #Video #Death #Dead #Pune #Chakan #ViralVideo #Navratri pic.twitter.com/CCR9U1sN6n
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 8, 2024
गरबा खेळण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लठ्ठपणा, हृदयविकार किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर गरबा खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करावी.
गरबा खेळताना तुम्हाला खूप घाम येतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे डान्स करताना पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे.
गरबा खेळण्यापूर्वी थोडे हलके स्ट्रेच करा आणि वॉर्म अप करा. शरीराला अधिकच्या हालचालींसाठी आधीच तयार कराल. ज्यामुळे इजा होण्याची शक्यता टाळता येईल. तसेच, हृदयावर कमी दबाव असेल.