मुंबई : केळं हे फळ बारमाही उपलब्ध असते. वजन घटवणार्यांसोबतच वजन वाढवणार्यांसाठीदेखील केळं खाणं फायदेशीर आहे. पिकलेलं केळं तुम्ही अनेक पदार्थांमध्ये हमाखास वापरले असेल परंतू पिकलेल्या केळ्याप्रमाणेच कच्च केळंदेखील फायदेशीर आहे. कच्च्या केळ्याचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या.
कच्च्या केळ्यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामधील आरोग्यदायी स्टार्च घटक आताड्यांना स्वच्छ करण्यास मदत करतात. आतड्यांमध्ये हानीकारक घटक जमून राहण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात.
वजन घटवणार्यांसाठी पिकलेल्या केळ्याप्रमाणेच कच्च केळंदेखील फायदेशीर ठरते. यामधील फायबर घटक अनावश्यक फॅट सेल्स आणि शरीरातील अशुद्ध घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
मधूमेहींनी नेमके काय खावे आणि किती खावे यावर अनेक मर्यादा असतात. परंतू मधूमेहींच्या रूग्णांना कच्च केळं वरदानच ठरते. कच्च्या केळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सतत भूक लागण्याच्या समस्येवर कच्च केळं फायदेशीर ठरते, कारण कच्च्या केळ्यामध्ये फायबर घटक अधिक असतात. सोबतच केळ्यातील इतर महत्त्वाच्या घटकांमुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
कच्च्या केळ्यामुळे डाएजेस्टिव्ह सिस्टम म्हणजेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याकरिता नियमित कच्च्या केळ्याचा आहारात समावेश करावा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.