डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
Dec 27, 2024, 12:18 PM ISTरात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होते का? याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की रात्री जेवण न केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात रात्रीचे जेवण वगळण्याचे फायदे आणि तोटे
Dec 23, 2024, 11:23 AM IST
केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण
आजकाल अनेक महिलांसाठी केस रंगवणे आणि सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करणे हा महत्त्वाचा भाग बनला आहे. केसांना आकर्षक लूक देण्यासाठी हे प्रकार लोकप्रिय असले तरी, याचे गंभीर दुष्परिणाम घातक ठरु शकतात. संशोधनानुसार, हेअर डाई आणि स्ट्रेटनरमध्ये असलेल्या काही घातक रसायनांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) धोका वाढतो.
Dec 18, 2024, 04:47 PM IST'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा
रक्तवाहिनी ही शरीरातील एक महत्त्वाची रचना आहे, ज्याद्वारे हृदयातून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. परंतु, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि काही विशिष्ट पेयांच्या अतिसेवनामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
Dec 16, 2024, 02:05 PM ISTडायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM ISTकिडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही ?
किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो.
Dec 8, 2024, 03:20 PM ISTतुम्हालाही तिखट खायला आवडतं का? ही सवय सोडा नाहीतर...
Spicy Food Side Effects: भारतामध्ये तिखट पदार्थ खाण्याची आवड अनेकांनाच आहे. आपल्याला तिखट अन्न खायला आवडत असलं, तरी त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही. सतत किंवा मर्यादेपेक्षा जास्त तिखट खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तिखट पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे आहे.
Nov 30, 2024, 02:21 PM ISTरात्री उशिरा जेवल्यामुळं रोज होतेय Acidity? सकाळी उठताच खा 'हे' एक फळ, लगेचच मिळेल आराम
Acidity Home Remedy : कामाचा ताण आणि त्यात ऑफिसच्या वेळा त्यामुळे रात्री उशिरा जेवण होतं. रात्री पोटभर जेवण केल्यानंतर हमखास सकाळी उठल्यावर अॅसिडीटीचा त्रास होतो. पण हे एक फळ खाल्ल्यास तुम्हाला यापासून नक्कीच आराम मिळेल.
Oct 29, 2024, 12:30 PM ISTअपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...
Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Mar 7, 2024, 05:06 PM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTसकाळी बेडवर लोळत राहायची सवय आहे का? तुम्हाला असू शकतात हे 5 गंभीर आजार
Struggling To Get Out Of The Bed You Might Have Dysania: तुम्हालाही सकाळी अंथरुणामध्ये लोळत रहावं वाटतं का? झोप पूर्ण झालेली असली तरी बेडवरुन उठायचा तुम्हालाही कंटाळा येतो का? असं असेल तर तुम्हाला आरोग्यासंदर्भातील काही गंभीर समस्या असू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा.
Aug 7, 2023, 01:19 PM ISTवयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTतुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!
Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?
May 25, 2023, 11:21 AM ISTफ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..
Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
May 17, 2023, 04:26 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत कामी येतील आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय; 'या' समस्यांपासून मिळेल मुक्ती
Home Remedies For Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यावेळी आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून सुटका होण्यासाठी काय उपाय करू शकतो, हे पाहूयात.
May 10, 2023, 05:53 PM IST