किशोरवयीन मुलांमध्येही जाणवते संधिवाताची समस्या, ही आहे नवी उपचार पद्धत

व्हायरसच्या संसर्गामुळेही हा आजार मुलांना होऊ शकतो 

Updated: Jul 31, 2020, 01:27 PM IST
किशोरवयीन मुलांमध्येही जाणवते संधिवाताची समस्या, ही आहे नवी उपचार पद्धत

मुंबई : लहान मुलांचा संधिवात सोळा वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळणारा संधिवात ही एक वेगळीच समस्या आहे. मुलांमध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवण्याच्या अनेक कारणे असतात. जुवेनाइल आर्थ्ररायीस (जेए) हा एक अनुवाशिंक आजार आहे. एखाद्या व्हायरसच्या संसर्गामुळेही हा आजार मुलांना होऊ शकतो असे रिजनेरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितले. 

या आजारात शरीर स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवतो. परिणामी, सांध्यांवर सूज येऊ लागते. आपल्या शरीरात खांदे, कोपर, मनगटे, हिप्स आणि गुडघे येथे हाडांचे प्रमुख सांधे असतात. या सांध्यांमुळे चालणे, उठणे व बसणे शक्य होते. परंतु, या आजारात एका सांधा जरी कमकुवत झाला तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. त्यातच लहान मुलांना संधिवात झाला तर त्यांची शारीरिक वाढ खुंटते आणि उभ्या आयुष्याचा प्रश्न उभा राहतो.

निदान

आम्हाला असे वाटत नव्हते की, संधिवात मुलांमध्येही होऊ शकतो. परंतु, सध्याच्या परिस्थितीनुसार लहान मुलांमध्येही संधिवातीच समस्या जाणवू लागली आहे. या विकारात मुलांना तीव्र वेदना आणि सांधेदुखीमुळे शारीरिक हालचाली कमी होतात. बालवयात हा विकार झाल्याने मुलांना खेळताना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.

जागतिक आकडेवारीनुसार, यूएसे मध्ये अंदाजित ३,००,००० मुलं संधिवाताच्या दुखण्याने त्रस्त आहेत. तर भारतात साधारणतः १.३ दशलक्ष लहान मुले या संधिवाताने ग्रासलेली आहेत. याशिवाय जगभरातील आकडेवारीनुसार अंदाजे ०.०७-१०/१००० व्यक्ती या आजारासह आयुष्य जगतायेत. विशेषतः लहान मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये संधिवाताचे दुखणं सर्वांधिक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील सिस्टमिक जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटीस हा संधिवाताचा आणखीन एक प्रकार आहे.

संधिवाताचे निदान

क्लिनिकल ट्रायलनुसार रक्ताचे नमुने घेऊन चाचणी करणे

संधिवात विकाराकरता (rheumatoid factor) अशा विविध चाचण्या प्रयोगशाळेत उपलब्ध      

उपचारपद्धत :

संधिवात असल्यास हाडांची झीज आणि असह्य वेदना होतात. या वेदना दूर करण्यासाठी आवश्यक औषध आणि स्टेरॉईटचा वापर केला जातो. याशिवाय शरीराला पुरेसे व्हिटामिन मिळावेत यासाठी औषधही दिली जातात.

पौष्टिक आहाराचे सेवन करणे

हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियम किंवा ड जीवनसत्त्व शरीराला कसे मिळतील, याकडे लक्ष द्यावेत.

नियमित फिजिओथेरपी करावी.

उपचाराचे उद्दिष्ट

आजाराच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवणे

हाडांची झीज न होता ती दिर्घकाळ योग्य पद्धतीने कार्य करतील

शारीरिक वाढ आणि विकासाला प्रोत्साहन द्या

अत्याधुनिक उपचारपद्धती

अँटी-सायटोकीन थेरपी (Anti-cytokine therapy)

इम्यूनोथेरपी (Immunotherapy)

ट्रेग सेल थेरपी (Treg cell therapy)

एक्सोसोम्स (Exosomes)

एक्सोसोम्स या उपचारपद्धतीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे जुवेनाईल आर्थ्रायटीस असणाऱ्या लहान मुलांच्या उपचार हे फायदेशीर ठरते. यामुळे मुलांच्या वेदना आणि जळजळ कमी होते. याशिवाय मुलांच्या शरीरातील ऊतींचे नुकसान होण्यापासूनही वाचवते. त्यामुळे ही उपचारपद्धत एक वरदान ठरतेय. याव्यतिरिक्त प्रमाणित एक्सोसोम्स प्रयोगशाळेत विकसित केले जाऊ शकतात. त्यामुळे या उपचारामुळे मुलांची आजारातून सुटका होऊन ते निरोगी आयुष्य जगू शकतात.

याबाबत बोलताना डॉ. प्रदीप महाजन म्हणाले की, ‘‘लहान मुलांमध्ये संधिवाताची समस्या दिसून येत आहे. या विकारावरील उपचारपद्धतीत आता झपाट्याने बदल होत असून याबाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. परंतु, अण्विक थेरपीच्या माध्यमातून आम्ही संधिवाताने त्रस्त लहान मुलांच्या हाडांचे आणि ऊतींचे पुर्नवसन करतोय. या उपचारामुळे हाडांची झीज न होण्यापासून रोखण्यास मदत मिळतेय. त्यामुळे एक्सोसोम्स ही उपचारपद्धत लहान मुलांना असह्य वेदनेतून सुटका देऊन पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची उमेद देत आहे.’’