नवीन वर्ष सुरु झालं की, नवे संकल्प केले जातात. पण नवे संकल्प करत असताना त्याबाबत योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. जसे की, हेल्दी राहणं किंवा वजन कमी करत असताना आपण सोशल मीडियावरील टिप्स फॉलो करत असतो. पण ते योग्य आहेत की नाहीत याची तपासणी करत नाही. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर तुम्हाला मदत करतात. ऋजुताने शेअर केलेल्या या 3 टिप्स नक्कीच मदत करतील.
आपण आपलं लोकं फूड विसरत चाललो आहे असं ऋजुता दिवेकरचे म्हणणे आहे. ऋतुनुसार किंवा पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या आपल्या पदार्थांकडे आपण दुर्लक्ष करतो. ग्लोबलायझेनमुळे जग जवळ आलं आहे पण याचा फटका देखील बसत आहे. आपण आपल्या ताटातील पदार्थांकडे दुर्लक्ष आणि ज्वारीच्या ऐवजी क्विनोआचा वापर करतो. त्यामुळे तुम्ही किती खाता आणि काय खाता हे महत्त्वाचं आहे.
अनेकदा लोकं योग्य वेळेच्या शोधात असतात पण ती योग्य वेळ कधीच येत नाही. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा किंवा अगदी आतापासून एक्सरसाईजा सुरुवात करा. लठ्ठपणा आल्यावरच किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यावरच व्यायाम केला पाहिजे असं नाही. त्यामुळे अगदी आजपासूनच शरीराची काळजी घ्या. कोणताच सोमवार किंवा कोणता नवीन महिना तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी मदत करत नाही. तर आता हा क्षण हेच तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यास मदत करतं.
वर्ष जरी नवे असले तरीही आपण तेच असतो. त्यामुळे नवीन वर्षाची वाट न पाहता सगळ्या गोष्टी करा. एवढंच नव्हे तर वजन कमी करणे ही शिक्षा नाही तर हा प्रवास आहे. सातत्य अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नव्या संकल्पांचा डोंगर तयार न करता आपलं रुटीनच हेल्दी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन वर्षात अनेकांनी सुदृढ आरोग्याचा संकल्प केला असेल. या सगळ्यांना ऋजुता दिवेकरने दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल.