नवी दिल्ली: आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.
आयआयटीजच्या बिमान बी मंडल यांनी सांगितले की, आजार बरे करणाऱ्या पेशी कमी झाल्या असल्यास त्यावर उपचारपद्धती मर्यादीत स्वरूपात आहेत. त्याचबरोबर या उपचारपद्धती अत्यंत खर्चिक आहेत, असे मंडल यांनी सांगितले.
मंडल यांनी सांगितले की, ही चटई बनवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारताच्या पूर्व भागात मिळणारे स्लिकचा वापर केला आहे. तसंच त्यांनी सांगितले की, मूगा हे सिल्क हा आजार लवकर बरा करण्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु, याचा वापर कारण्यापूर्वी उंदीर किंवा डुक्कर यांसारख्या प्राण्यांवर प्रयोग करण्यात येईल. त्यानंतर मानवावर प्रयोग केला जाईल.