Intimate होण्यापूर्वी तुमच्या पार्टनरला 'हे' 3 प्रश्न नक्की विचारा, नंतर पश्चात्ताप नको!

कोणत्याही व्यक्तीसाठी इंटीमेट असणं ही एक मोठी पायरी असते.

Updated: Aug 13, 2022, 10:31 AM IST
Intimate होण्यापूर्वी तुमच्या पार्टनरला 'हे' 3 प्रश्न नक्की विचारा, नंतर पश्चात्ताप नको! title=

मुंबई : सामान्य जीवनात एखाद्या व्यक्तीशी इंटीमेट होणं म्हणजे केवळ शारीरिक संबंध असणं नव्हे तर या काळात ती व्यक्ती त्या व्यक्तीशी मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही जोडली जाते. कोणत्याही व्यक्तीसाठी इंटीमेट असणं ही एक मोठी पायरी असते. अशा परिस्थितीत, आपण जोडीदाराला काही प्रश्न विचारू शकता. चला तर बघूया हे प्रश्न कोणते आहेत.

पार्टनरला विचारा हे 3 प्रश्न

आपण एकमेकांसाठी काय आहोत?

तुमच्या पार्टनरसोबत इंटीमेट होण्यापूर्वी तुम्हा दोघांची विचारसरणी सारखी आहे की नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला थेट विचारू शकता की, तो अविवाहित आहे की इतर कोणाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, जवळ येण्यापूर्वी ही गोष्ट निश्चित करा.

STD आणि HIV टेस्ट कधी केली होती?

हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, परंतु कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यांची एसटीआय आणि एचआयव्ही चाचणी कधी केली हे विचारणं महत्त्वाचं आहे. जर सर्व काही ठीक असेल तर आपण नातेसंबंधात पुढे जाण्याचा विचार करू शकता.

गर्भनिरोधकासाठी आपण काय वापरणार?

इंटीमेट होताना लक्षात ठेवा की नंतर नको असलेली गर्भधारणा किंवा कोणताही आजार होण्याचा धोका टाळण्यासाठी तुम्ही गर्भनिरोधक म्हणून काय वापरणार आहात हे आपापसात स्पष्ट असले पाहिजे. अनेक मुलांना इंटीमेट होताना प्रोटेक्शन वापरणं आवडत नाही. अशा परिस्थितीत, हे महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या जोडीदाराला गर्भनिरोधकाबाबत अगोदरच विचारावं.