'या' 5 समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध प्यावं की नाही? अपुरं ज्ञान ठरू शकतं घातक!

दुधाच्या अतिसेवनामुळे काही लोकं लिव्हरमध्ये सूज वाढण्याची तक्रार करतात. त्यामुळे काही समस्या असलेल्या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये.

Updated: Apr 6, 2022, 10:37 AM IST
'या' 5 समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध प्यावं की नाही? अपुरं ज्ञान ठरू शकतं घातक! title=

मुंबई : आपण लहानपणापासून दूध पिण्याचे फायदे ऐकले असतील. दूधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमीन ए, केसोबत थायमाईन आणि निकोटिनिक एसिड असे न्यूट्रीशन्स असतात. त्यामुळे दुधाचं सेवन दररोज करावं असा सल्ला तज्ज्ञ देखील देतात. तसंच दूधाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, तणाव, अनिद्रा आणि थकवा यांचा त्रासंही कमी होतो. शिवाय कॅल्शियम आणि दातांच्या मजबूतसाठी गरजेचं असतं.

या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये

ज्या व्यक्तींना काविळ आणि अतिसार सारख्या समस्या आहेत किंवा ज्यांना सूज येण्याची तक्रार आहे त्यांनी दूधाचं सेवन करू नये. अनेकदा असं दिसून आलंय की, दुधाच्या अतिसेवनामुळे काही लोकं लिव्हरमध्ये सूज वाढण्याची तक्रार करतात. त्यामुळे काही समस्या असलेल्या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये.

फॅटी लिव्हर

फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्यांनी दूध पिऊ नये. कारण अशा लोकांना दूध सहज पचत नाही. फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या रूग्णांना प्रथिनं अत्यंत मर्यादित प्रमाणात घेण्याचा सल्ला देण्यात येतो. दुधामध्ये प्रथिनं भरपूर असतात. अशा स्थितीत दूध प्यायल्याने अपचन, अॅसिडिटी, गॅस, सुस्ती, थकवा, वजन वाढणं या समस्या उद्भवू शकतात.

गॅसची समस्या

दूधामध्ये लॅक्टोज असतं जे कधी-कधी पचनक्रियेसाठी बाधा आणू शकतं. त्यामुळे जास्त दूध प्यायल्याने जुलाब, सूज येणं किंवा गॅस होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना गॅसची समस्या आहे त्यांनी दुधाचे सेवन टाळावं, असा सल्ला डॉक्टर देतात. 

एलर्जी

काहींना दुधाची अॅलर्जी असण्याची शक्यता असू शकते. यामुळे त्वचेवर खाज सुटणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा शरीरावर लाल पुरळ येण्याबरोबरच सूज येऊ शकते. त्यामुळे जर कोणाला ऍलर्जीची समस्या असेल तर त्यांनी दुधाचे सेवन करू नये.

स्थूलता

जर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या असेल तर तुम्ही दुधाचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण दूध एक कंप्‍लीट फूड मानलं जातं आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होण्याची शक्यता असते.

त्वचेच्या समस्या

अति प्रमाणात दुधाचं सेवन करणं देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरत नाही. यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. म्हणून दुधाचं सेवन काळजीपूर्वक केलं पाहिजे.