रस्त्यावरील आणि ऑफिसच्या लाईट्स ठरतायत तुमच्यासाठी जीवघेण्या? पाहा काय आहे नेमकं प्रकरण...

तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये असणारे चमकणारे लाईट्स गंभीर आजाराचा धोका निर्माण करतात.

Updated: Nov 23, 2022, 04:32 PM IST
रस्त्यावरील आणि ऑफिसच्या लाईट्स ठरतायत तुमच्यासाठी जीवघेण्या? पाहा काय आहे नेमकं प्रकरण... title=

Diabetes Risk: आतापर्यंत तुम्ही लठ्ठपणा (Obesity), अनहेल्दी लाइफस्टाइल (Unhealthy Lifestyle) आणि अयोग्य आहारामुळे (Wrong Diet) मधुमेहाचा (Diabetes) धोका बळावत असल्याचं ऐकलं असेल. मात्र कधी तुमच्या कानावर आलंय का की, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे देखील मधुमेहाचा धोका वाढतो. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणर नाही, पण हे खरं आहे. तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये असणारे चमकणारे लाईट्स मधुमेहाचा धोका निर्माण करतात.

चीनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासामधून हे समोर आलं आहे. या स्डटीमध्ये मधुमेहाशी संबंधीत काही गोष्टी समोर आल्यात, ज्यामुळे तज्ज्ञ व्यक्तीही हैराण झाल्या आहेत. 

नव्या रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, नुकत्यात केलेल्या एका संशोधनातून तज्ज्ञांनी असा दावा केलाय की, रात्रीच्या वेळी आर्टिफिशियल लाइटच्या अधिक संपर्कात येणाऱ्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका इतर व्यक्तींपेक्षा 28 टक्क्यांनी वाढतो. 

या संधोधनात, आऊटडोर आर्टिफिशियल लाइट एट नाइट (LAN) आणि मधुमेह यांच्यामध्ये संबंध असल्याचं समोर आलं आहे. मधुमेहासंदर्भात हा रिसर्च शांघायच्या जिआतोंग यूनिवर्सिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केला आहे. यामध्ये जवळपास 98000 लोकांचा समावेश करण्यात आला असून याचं डाटा एनालिसिस करून या स्टडीचा रिझल्ट तयार केलाय. 

या शहरात राहणाऱ्या लोकांना अधिक धोका

या संशोधनातून असं समोर आलंय की, रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाइट्स, पार्किंग लॉट लाइट्स, गाड्यांच्या हेड लाईट, घर आणि ऑफिसच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या लाईट्समुळे लाईट पोल्यूशन वाढतं. आर्टिफिशियल लाइटमुळे ग्लो निर्माण होऊन पोल्युशन तयार होतं. यामुळे आकाशातील तारेही नीट दिसत नाहीत आणि नॅचरल इको सिस्टीम बिघडते. 

गावाच्या तुलनेत लाईट पोल्यूशन शहरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतं. त्यामुळे शहरी लोकांमध्ये मधुमेह होण्याचा धोकाही अधिक असतो. जगातील जवळपास 80 टक्के लोकं लाईट पोल्युशनच्या सानिध्यात जगतात. अमेरिका आणि युरोपमधील जवळपास 99 टक्के लोकं लाईट पोल्युशनची शिकार आहे. ज्यामुळे अनेक इतर आजारही उद्भवू शकतात.