मुंबई : धूम्रपान किंवा कोणत्याही प्रकारची नशा करणे हे शरीरासाठी फायदेशीर नसतं. उलट हे शरीरासाठी इतकं धोक्याचं आहे की, यामुळे बऱ्याच लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. धुम्रपानामुळे आपल्या शरीराचे सर्व प्रकारचे नुकसान होते, शिवाय हे करत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात चार प्रकारचे बदल होऊ लागतात. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया हे बदल आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकतात.
धूम्रपानाचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते, परंतु हा समज चुकीचा आहे याचा तुमच्या मेंदूवरही परिणाम होतो. रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्हाला स्मोकिंगची सवय लागते, तेव्हा ते तुमच्या मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात. धूम्रपानामुळे तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
मेंदूशिवाय धूम्रपानाचा आपल्या हृदयावरही वाईट परिणाम होतो. असे मानले जाते की, धूम्रपानामुळे संपूर्ण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली खराब होते. खरं तर, जेव्हा निकोटीन शरीरात प्रवेश करते, तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
धुम्रपानामुळे दातांचेही नुकसान होते. असे मानले जाते की, धूम्रपानाचा तुमच्या दातांवर थेट परिणाम होत नाही. मात्र, हळूहळू तुमचे दातही पिवळे होऊ लागतात.
धूम्रपानामुळे तुमच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो. मात्र, अनेकांना याची माहिती नसते. रिपोर्टनुसार, तुम्ही धुम्रपान करताच, निकोटीन आणि तंबाखू तुमच्या तोंडातून तुमच्या घशात आणि त्यानंतर तुमच्या पोटातून तुमच्या शरीरात जाते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, भूक न लागणे यासह काही पचनाच्या समस्या निर्माण होतात.
त्यामुळे तुम्हाला अशा या संबंधीत कोणतेही लक्षणे दिसू लागले की, सावध व्हा आणि धुम्रपान आत्ताच सोडा.