Solar Eclipse And Lunar Eclipse : ग्रहण ही एक खगोल शास्त्रातील घटना आहे जी दरवर्षी घडत असते. 2023 मध्ये 2 ग्रहण लागणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल लागले. तर चंद्रग्रहण हे 5-6 मे रोजी होते. आता वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात 15 दिवसांच्या फरकांनी दिसणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात 14 तारखेला सूर्यग्रहण दिसणार आहे. तर 28-29 ऑक्टोबरला चंद्रग्रहण दिसणार आहे. या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर' (Rinf Of Fire) असे देखील म्हटले जाणार आहे. चंद्र पृथ्वीपासून नेहमीपेक्षा जास्त अंतरावर आहे, ज्यामुळे तो आकाराने लहान दिसतो आणि सूर्याभोवती एक वलय तयार होते. याला रिंग ऑफ फायर म्हणता येईल. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान जाते तेव्हा आंशिक चंद्रग्रहण होते. हे तिघे एकाच रेषेत येतात ज्यामुळे चंद्रग्रहण दिसते.
NCBI च्या रिपोर्टनुसार ग्रहण काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पण या ग्रहणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच असा नाही. ग्रहण काळात गर्भवती स्त्रिया, बालके आणि ज्येष्ठ व्यक्तींना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. याचा मानवी जीवनावर कळत नकळत परिणाम होतो. हिंदू पौराणिक कथांमध्ये देखील ग्रहण हानिकारक असल्याचं सांगितले आहे. या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी विज्ञानाच्या दृष्टीकोनातूनही ग्रहण काळात काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहणातून बाहेर पडणाऱ्या लहरी शरीरासाठी हानिकारक असतात.
ग्रहण काळात ते उघड्या डोळ्यांनी सहज पाहू नये. ग्रहण पाहताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेची असते. NCBI च्या रिपोर्टनुसार, ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्याचा रेटिना खराब होतो. अनेक प्रकरणांमध्ये ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे डोळे गेल्याच्या घटना देखील कानावर परडले आहेत. तसेच संवेदनशील डोळ्यांना देखील इजा होऊ शकते.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.