सावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं

Smartphone Zombies : देशात वेगाने 'स्मार्टफोन झोम्बी' वाढत चालले आहेत. देशातल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. बंगळुरुमध्ये या आजाराविषयी जागरुक करणारे पोस्टर्स लागले असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Updated: Jan 23, 2024, 04:20 PM IST
सावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं title=
संग्रहित फोटो

Smartphone Zombies : मोबाईलचा शोध ही मानवी आयुष्यातील मोठी उपलब्धी आहे. मोबाईलने मानवी जीवनातील सामाजिक आणि भौगोलिक अंतर कमालीचे कमी केलं आहे. मोबाईलने संपूर्ण जीवन व्यापलं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा होत्या. पण आता या मध्ये एक नव्या गरजेची भर पडली आहे, ती म्हणजे आपला मोबाइल फोन. एक वेळेस जेवण मिळाले नाही तर चालेल. मात्र मोबाइल  शिवाय चैन पडत नाही अशी प्रत्येकाची स्थिती झाली आहे. तुम्हालाही दिवसभर मोबाईल (Mobile) हातात घेऊन बसायची सवय आहे? तर वेळीच सावध व्हा. देशात 'स्मार्टफोन झोम्बी' (Smartphone Zombies) नावाचा आजार वेगाने वाढतोय. 

काय आहे 'स्मार्टफोन झोम्बी'
सध्याच्या काळात मोबाईलचा वापर आपण नाकारु शकत नाही. एखाद्याला तात्काळ संपर्क करायचा असेल किंवा मेसेज करायचा असेल तर मोबाईलचा वापर महत्त्वाचा ठरतो. याशिवाय जेवणापासून शॉपिंगपर्यंत प्रत्येक काम मोबाईलच्या एका क्लिकवर सहजसोप झालंय. पण आता मोबाईलचा अतिरेक होऊ लागलाय. कामाव्यतिरिक्तही सतत मोबाईलमध्ये पाहाण्याचं व्यसन लागलं आहे. काही काम नसल्यावर, गाडीने किंवा ट्रेनने प्रवास करताना इतकंच काय तर रस्त्याने चालतानाही प्रत्येकाचं डोकं मोबाईलमध्येच असतं. मोबाईल बघत रस्ता क्रॉस करताना अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या आहे.

बंगळुरुमध्ये लागले पोस्टर्स
वास्तविक मोबाईलच्या अतिवापरावर लक्ष वेधण्यासाठी बंगळुरुमध्ये (Bengaluru) एक पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरने लोकांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडियावरही हे पोस्टर व्हायरल झालं आहे. या पोस्टरमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापराचे धोके सांगण्यात आलं आहे. या पोस्टरवर स्मार्टफोन झोम्बीपासून सावधान अशी उपहासात्मक सूचना करण्यात आली आहे.  वास्तविक या पोस्टरच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोबाईलमधून लक्ष काढून आजूबाजूलाही पाहा असा संदेश यातून देण्यात आला आहे. 

काय आहे पोस्टरमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्याया पोस्टरमध्ये दोन व्यक्ती दाखवण्यता आल्या आहेत. या दोन्ही व्यक्ती रस्ता क्रॉस करताना समोर किंवा आजूबाजूला बघण्याऐवजी मोबाईलमध्ये बघत रस्ता क्रॉस करताना दिसत आहेत. यामुळेच अशी सवय असणाऱ्या लोकांना स्मार्टफोन झोम्बी असं म्हणण्यात आलंय. 

19 जानेवारीला हे पोस्टर बंगळुरु शहरात लावण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर हे पोस्टर वेगाने व्हायरल झालं आहे. यावर युजर्सने अनेक कमेंट केल्या आहेत.