कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा लहान मुलांवर परिणाम नाही!

कोरोनाचा हा डेल्टा प्रकार आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये पसरला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Updated: Jul 1, 2021, 08:39 AM IST
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा लहान मुलांवर परिणाम नाही! title=

मुंबई : भारतात सापडलेला कोरोना नवा डेल्टा प्लस हा संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरतोय. कोरोनाचा हा डेल्टा प्रकार आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये पसरला असल्याची नोंद करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात देखील या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडत आहेत. मात्र या डेल्टा प्लसचा लहान मुलांवर परिणाम होत नसल्याचं सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

CSIRच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, डेल्टा प्लस व्हेरियंट हा धोकादायक नाही. आणि या नव्या व्हेरिएंटचा लहान मुलांवर परिणाम होत नाही. शिवाय डेल्टा प्लस घातक नसल्याचा CSIRने केंद्राला अहवाल दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा डेल्टा प्लस वेरिंयंट धोकादायक नसल्याचं विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी म्हटलंय.

डॉ. मांडे यांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांसाठी हा वेरिएंट अधिक धोकादायक आहे असं नाही. अजून आपल्याकडे याबाबत वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोणताही पुरावा नाहीये. डेल्टा प्लस या स्ट्रेनमध्ये म्युटेशन सापडलं आहे. डेल्टा प्लस असम नामकरणं झाल्याने लोकांच्या मनात त्याबाबत भीती आहे. मात्र त्यामध्ये इतकी गंभीरता नाहीये. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये.

डॉ. मांडे पुढे म्हणाले, डेल्टा प्लस वेगाने पसरतोय असं जे म्हटलं जातंय ते चुकीचं आहे. सध्यातरी आपल्याकडे पुरावा नाहीये. मुख्य म्हणजे लोकांनी लवकरात लवकर स्वतःचं लसीकरण करून घ्यावं.