Maharashtra Cabinet Portfolio: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Debendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 5 फेब्रुवारीला त्यांचा शपथविधी पार पडला. यानंतर 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. पण त्यानंतर सर्वांना अपेक्षा असलेलं खातेवाटप मात्र लांबत चाललं होतं. हिवाळी अधिवेशनाच्या आधी तरी खातेवाटप होईल अशी आशा होती. मात्र खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.
1) देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक - वनमंत्री
11) दादा भुसे - शालेय शिक्षण
12) संजय राठोड - जलसंधारण
13) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
15) उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
19) अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
20) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
22) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23) अदिती तटकरे - महिला व बालविकास
24) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
25) माणिकराव कोकाटे - कृषी
26) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
27) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
28) संजय सावकारे - कापड
29) संजय शिरसाट - सामाजिक न्याय
30) प्रताप सरनाईक - वाहतूक
31) भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
32) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
33) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
34) आकाश फुंडकर - कामगार
35) बाबासाहेब पाटील - सहकार
36) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
1) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार
2) माधुरी मिसाळ - शहर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
3) पंकज भोयर - गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शाळा शिक्षण, सहकार, खाण
4) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, एनर्जी, महिला आणि बालकल्याण
5) इंद्रनील नाईक - औद्योगिक, उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
6) योगेश कदम - गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधे प्रशासन
Maharashtra Portfolio Allocation | CM Devendra Fadnavis gets Home Ministry; Law & Judiciary
Deputy CM Eknath Shinde gets Urban Development & Housing and Public Works.
Deputy CM Ajit Pawar gets Finance & Planning and Excise dept pic.twitter.com/49EzXijvkd
— ANI (@ANI) December 21, 2024
मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती.
महसूल
जलसंधारण
उच्च व तंत्र शिक्षण
कौशल्य विकास
सांस्कृतिक
वन
राजशिष्टाचार
पर्यावरण
अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
अदिती तटकरे - महिला व बालकल्याण
धनंजय मुंडे - अन्न नागरी पुरवठा
बाबासाहेब पाटील - सहकार्य
मकरंद पाटील - मदत व पुनर्वस
दत्ता मामा भरणे - क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक
माणिकराव कोकाटे - कृषी
नरहरी झिरवाळ - अन्न व प्रशासन
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मात्र फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मविआत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेला 20 जागा मिळाल्या. मनसेला तर एकही जागा जिंकता आली नाही.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.