मृत्यूनंतर व्यक्तीच्या शरीराचा हा भाग तोडण्याची प्रथा; ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

 विविध प्रकारच्या परंपरा केवळ देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळतात.

Updated: Sep 17, 2021, 01:20 PM IST
मृत्यूनंतर व्यक्तीच्या शरीराचा हा भाग तोडण्याची प्रथा; ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

दिल्ली : विविध प्रकारच्या परंपरा केवळ देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळतात. कुठेतरी लग्नात वधूचे कपड्यांसंदर्भात प्रथा आहे, तर कुठेतरी लग्नाआधी, महिलांनी रोज एक तास रडण्याची परंपरा पाळली जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र परंपरेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

जेव्हा कुटुंबातील कोणाचा मृत्यू होतो तेव्हा प्रत्येकजण शोक करतो. हे अगदी नैसर्गिक आहे. जर कोणी रडत दु:ख व्यक्त केलं तर कोणी मेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रतिज्ञा घेतं. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगात असे काही लोक आहेत जे मरण पावलेल्या व्यक्तीचा दात तोडून त्याला स्वःतसोबत ठेवण्याची परंपरा ठेवतात.

'डेथ टीथ स्टोरी' 

Death Teeth Story नावाच्या एका महिलेने या अनोख्या परंपरेची कथा शेअर केली आहे. Mirror.ukमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महिलेने लिहिलंय "माझ्या पतीच्या कुटुंबात मृत्यू आणि अंत्यसंस्काराबाबत एक विचित्र परंपरा आहे. तो यूके मधील वेल्स शहरात राहतो. त्यांच्या कुटुंबात मृत व्यक्तीचे दात तोडण्याची आणि तो कायमचा स्वतःकडे ठेवण्याची परंपरा आहे."

कोणाला कोणता दात मिळतो?

महिलेने सांगितले की, जेव्हाही तिच्या पतीच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचे अंतिम संस्कार करण्यापूर्वी त्याचे दात तोडण्यात येतात. हे दात नंतर मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना दिले जातात. जो मृत व्यक्तीला प्रिय आहे, त्याला त्यानुसार दात मिळतात. एवढंच नाही तर मृत व्यक्तीने त्याच्या हयातीत गोळा केलेले सर्व दात, ते दात त्याच्याबरोबरच अंत्यसंस्कार केले जातात.

दात स्वतःजवळ ठेवण्यापासून महिलेने दिला होता नकार

महिलेने सांगितलं की, तिला या परंपरेची माहिती ज्यावेळी तिच्या पतीची आजी मरण पावली आणि तिच्या सासूने कापडी पिशवीत आजीचे दात ठेवले होते. जेव्हा पहिल्याने हा दात तिच्याकडे ठेवण्यास नकार दिला, तेव्हा तिचा नवरा तिच्यावर रागावला.

त्या महिलेने सांगितलं की, मला मृत व्यक्तीचे दात माझ्याकडे ठेवायचे नाहीत. तसंच माझ्या मृत्यूनंतर कोणीतरी माझे सर्व दात तोडावेत असंही मला कधी वाटत नाही. ही महिला म्हणते की, तिच्या पतीचे कुटुंब खूप प्रिय आहे, परंतु तिच्यासाठी हा विधी हास्यास्पद आहे आणि ही परंपरा मला पाळायची नाही.