Belly Fat: रात्रीच्या 'या' चुका वाढवतायत तुमच्या पोटाचा घेर, फीट राहायचंय तर आजच लक्ष द्या!

पोटाचा घेर वाढण्यासाठी फक्त जंक फूडचं नाही तर तुमच्या काही ठराविक चुका देखील कारणीभूत ठरतात. त्या कोणत्या?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 9, 2024, 05:17 PM IST
Belly Fat: रात्रीच्या 'या' चुका वाढवतायत तुमच्या पोटाचा घेर, फीट राहायचंय तर आजच लक्ष द्या! title=

Belly Fat: आजकाल प्रत्येकाला फीट राहायचं असतं. यासाठी आपण विविध प्रयत्नही करतो. मात्र यावेळी फॅट बर्न करणं हे काही सोपं काम नाहीये. अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे यामुळे बेली फॅट वाढण्यास मदत होते. जर काहीही करून तुमचं बेली फॅट बर्न होत नसेल तर यासाठी तुमच्या काही चुका कारणीभूत ठरू शकतात.

खाण्यापिण्याबाबतच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या सवयींमुळे पोटाजवळील फॅट वाढू लागतं. पोटाची चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबतच काही तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजे. यावेळी खास करून लोकं रात्रीच्या वेळेस या चुका करतात. विशेषत: रात्रीच्या वेळी, बरेच लोक काही सवयी फॉलो करतात ज्यामुळे वजन वाढण्यास कारणीभूत असतात. जाणून घेऊया सवयी कोणत्या आहे.

पहिली चूक कोणती?

यामध्ये पहिली चूक म्हणजे रात्रीचं उशीरा जेवण. रात्रीचं जेवण उशिरा जेवल्याने आणि नंतर लगेच झोपी गेल्याने तुमच्या शरीरातील फॅट वाढतं. याचं कारण म्हणजे ते पचायला शरीराला वेळ मिळत नाही. रात्रीच्या जेवणात तळलेलं अन्न खाल्ल्याने तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. कारण या गोष्टींमध्ये भरपूर कार्ब्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरात फॅट्स वाढू लागतात.

रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणं

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. आपल्यापैकी अनेक जण जेवणानंतर गोड खातात. पण तुम्हाला माहिती आहे का की ही सवय तुमचा लठ्ठपणा वाढवू शकते. गोड पदार्थ तुमच्या शरीरात फॅट वाढवतात, त्यामुळे रात्रीच्या वेळेस गोड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

रात्री स्नॅक्स खाणं

रात्रीच्या वेळस आपण अजून एक चूक करतो ती म्हणजे जंक फूड किंवा स्नॅक्स खाणं. अनेकदा आपण रात्रीच्या वेळेस सिनेमा पाहताना चिप्स किंवा इतर जंक फूड खातो. मात्र ते आपल्या शरीरासाठी योग्य नसतं. या पदार्थांमध्ये असलेल्या घटकांमुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)