सावधान! शिळ्या अन्नामधील 'या' गोष्टी कधीच पुन्हा गरम करुन खाऊ नका...

कोणत्या गोष्टीं पुन्हा गरम करुन खाणे टाळले पाहिजे.

Updated: Jul 31, 2021, 08:34 PM IST
सावधान! शिळ्या अन्नामधील 'या' गोष्टी कधीच पुन्हा गरम करुन खाऊ नका... title=

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सवय असते की, जर जेवण शिल्लक राहिले, तर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खातो. कारण आपल्याला नेहमी वाटते की, कोणताही खाद्यपदार्थ फेकून देऊ नये. पण, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पुन्हा गरम करुन खाणे देखील तुम्हाला महाग पडू शकते. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यांना नुकसान होऊ शकते जेणेकरून आपण पुढील अडचणी देखील टाळू शकातो.

चला तर मग जाणून घेऊयात की, कोणत्या गोष्टीं पुन्हा गरम करुन खाणे टाळले पाहिजे.

पालक आणि हिरव्या भाज्या

जर कधी पालक किंवा कोणत्याही हिरव्या भाज्या तुमच्या जेवणात राहिल्या असतील, तर त्या पुन्हा गरम करू नयेत. खरं तर, पालकमध्ये भरपूर लोह असते आणि जेव्हा तुम्ही ते पुन्हा गरम करता तेव्हा ते ऑक्सिडाइझ होतात. लोह ऑक्सिडेशनमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.

भातापासून दूर रहा

न शिजवलेल्या तांदळामध्ये काही स्पोर्स म्हणजे जिवाणू आढळतात आणि तुम्ही तांदूळ शिजवता तेव्हा देखील ते त्यात असते. परंतु ते आपल्या शरीराला हानिकारक नाहीत. पण, तांदूळ शिजवल्यानंतर, जेव्हा तो खोलीच्या तपमानावर बराच काळ ठेवला जातो, तेव्हा हे जीवाणू बॅक्टीरियामध्ये बदलतात. यानंतर, जेव्हा हे बॅक्टीरिया तुमच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा तुम्हाला अन्नाची विषबाधा म्हणजे फूड पॉइजनिंग होऊ शकते.

अंडी खाऊ नयेत

अंड्यात भरपूर प्रथिने असतात, पण जेव्हा अंडी वारंवार उष्णतेला सामोरे जातात, तेव्हा त्यांच्यापासून खूप त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत अंडी शिजवल्यानंतर लवकरात लवकर खावीत असा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला ते खायचे असेल, तर तुम्ही ते थंड खाऊ शकता. प्रथिनांसह उपस्थित नायट्रोजन गरम केल्याने कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे अंड एकदा उकडल्यानंतर पुन्हा गरम करु नये.

चिकन

चिकनसाठी असेही म्हटले जाते की, चिकन पुन्हा पुन्हा गरम करू नये. त्यात उपस्थित असलेल्या कोंबडीच्या मासाला वारंवार गरम केल्यामुळे, त्यात बरेच बदल होतात आणि प्रथिन्यांची रचना पूर्णपणे बदलते. त्यामुळे पुन्हा गरम केलेले चिकन खाल्ल्याने पचन बिघडते.

मशरूम

मशरूम शिजवल्याच्या काही वेळातच मशरूम खाल्ले पाहिजेत. मशरूमला दुसऱ्या दिवसासाठी कधीही ठेवू नये, कारण त्यात असे अनेक घटक असतात, जे नंतर तुमच्या पाचन तंत्रासाठी हानिकारक ठरु शकतात. जर मशरूम शिल्लक असतील तर ते थंड खा आणि ते गरम होऊ नये.